

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड इंडस्ट्रीचे निर्माते मधु मंटेना ११ जून रोजी रविवारी लेडी लव्ह इरा त्रिवेदीसोबत विवाहबंधनात अडकले. इरा त्रिवेदी योग विशेषज्ज्ञ आणि लेखिका आहे. (Madhu Mantena-Ira Trivedi Wedding) कपलने या खास दिनी पारंपरिक पोषाक परिधान केला होता. मधु यांनी मॅचिंग पायजामासोहत बेज रंगाचा कुर्ता घातला होता. तर इरा गुलाबी कांजीवरम साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती. (Madhu Mantena-Ira Trivedi Wedding)
इरा त्रिवेदीने लग्नाचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं-'आता मी पूर्ण झाले.' इरा ही ३९ वर्षांची तर मधू मंटेना ४८ वर्षांचे आहेत.
मधु मंटेनाचे पहिले लग्न फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताशी झाले होते. मधु – मसाबा यांनी २०१५ मध्ये लग्न केले होते. चार वर्षांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यावर्षी जानेवारीमध्ये, मसाबाने 'बॉम्बे वेलवेट' फेम अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले. सत्यदीप मिश्रा अदिती राव हैदरीचा एक्स पती आहे.
मधु मंटेना-इरा त्रिवेदी यांचा मेहंदी सोहळा शनिवारी रात्री झाला. सोहळ्यात आमिर खान, ऋतिक रोशन, राजकुमार रावसह अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला.
इरा त्रिवेदी-मधू मंटेना यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. शुभेच्छा देण्यासाठी अनेक स्टार्स पोहोचले. यामध्ये आमिर खान ते ऋतिक रोशन, बोनी कपूर, सुभाष घई, कार्तिक आर्यनपर्यंत, सर्व स्टार्स दिसले. अल्लू अर्जुननेही यावेळी एन्ट्री घेतली.
video – viralbhayani insta वरून साभार