Krishna Bhatt-Vedant Sarda wedding : विक्रम भट्ट यांची मुलगी अडकली लग्नाच्या बेडीत | पुढारी

Krishna Bhatt-Vedant Sarda wedding : विक्रम भट्ट यांची मुलगी अडकली लग्नाच्या बेडीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांची मुलगी कृष्णा भट्ट बॉयफ्रेंड वेदांतसोबत लग्नाच्या बेडीत (Krishna Bhatt-Vedant Sarda wedding) अडकली. तिने ११ जून रोजी परिवार आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत वेदांतशी लग्न केले. लग्नसोहळ्यासाठी आमिर खान, बॉबी देओल, कुणाल कपूर, सनी लिओनी आपल्या परिवारासोबत पोहोचली. कृष्णाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कृष्णा भट्ट आणि वेदांत यांनी एकापेक्षा एक पोज दिले. (Krishna Bhatt-Vedant Sarda wedding)

कृष्णा -वेदांत यांनी डिसेंबर २०२२ रोजी साखरपडा केला होता. कृष्णाच्या लग्नाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती.

आमिरशिवाय सनी लिओनी, बॉबी देओल, कुणाल कपूर, पूजा भट्ट, संदीपा धर, अविका गौर या सेलेब्सनी हजेरी लावली. सनी लिओनी आपल्या पती आणि मुलांसोबत कृष्णा भट्टच्या लग्नात पोहोचली. पूजा भट्ट, महेश भट्ट आणि इतर घरच्या मंडळींच्या उपस्थितीत कृष्णा आणि वेदांतचे लग्न झाले. या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळताहेत.

कोण आहे वेदांत सारडा?

वेदांत सारडा एक ट्रॅव्हल इंजिन चालवतो, ज्याचे नाव WTFair आहे. कृष्णाने सांगितलं होतं की, हे सर्वात गतिमान हॉलिडे प्लॅनिंग इंजिन आहे. वेदांतने या कंपनीची स्थापना २०१४ मध्ये भावासोबत मिळून केली होती.

नवा चित्रपट लवकरच

कृष्णा भट्टचा चित्रपट ‘1920: हॉरर्स ऑफ द हार्ट’ २३ जून रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट कृष्णा भट्टने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये राहुल देव, बरखा बिष्ट, अवतार गिल आणि अमित बहलदेखील दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Bhatt (@krishnavbhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikram Bhatt (@vikrampbhatt)

Back to top button