नातं पोखरून काढणारी वाळवी! वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर या दिवशी | पुढारी

नातं पोखरून काढणारी वाळवी! वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर या दिवशी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘वाळवी’ हा शब्द ऐकताच आपल्याला आठवते ती, लाकूड पोखरणारी किड. एवढं नुकसान करणारी हीच वाळवी जर एखाद्या नात्याला लागली तर? अशीच नात्याला लागलेली वाळवी आपल्याला येत्या १८ जूनला ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर’ च्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

झी स्टुडिओज निर्मित व परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ लवकरच छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार. अनिकेत आणि अवनी नवरा बायको आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. अनिकेत ने आखलेल्या ह्या डावात त्याला देविकाची साथ आहे, हे सगळं होत असताना तिकडे अंशुमनही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय.

क्षणोक्षणी कुतूहल वाढवणाऱ्या ‘वाळवी’त अनिकेत आणि देविकाचा मनसुबा पूर्ण होणार की, आखलेला डाव फिस्कटणार? की भलतंच काहीतरी होणार? अंशुमनकडे नेमकं काय गुपित आहे? वाळवीचा या सगळ्याशी काय संबंध? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे १८ जूनला पाहायला मिळणार आहेत.

Back to top button