टॅक्सी चालकाने बनवला ‘बबली’; ‘या’ दिवशी येणार भेटीला | पुढारी

टॅक्सी चालकाने बनवला 'बबली'; 'या' दिवशी येणार भेटीला

पुढारी ऑनलाईन : डोळ्यात चित्रपट क्षेत्रात येण्याचे स्वप्न होतं, पण हातात असलेली कुटुंबाची जबाबदारीमुळे गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करावे लागले. पण हा सर्व खडतर प्रवास पूर्ण करीत सतीश सामुद्रे हे एक यशस्वी निर्माता बनले आहेत. निर्माते सतीश सामुद्रे यांचा आगामी ‘बबली’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

पॅशन मुव्हीज प्रस्तुत ‘बबली’ हा चित्रपट २३ जून २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. रोबर्ट मेघा यांनी ‘बबली’ चित्रपटाचं दिग्दर्शन केल आहे. ‘तू काही बी म्हण बबले, पण दादा नको म्हणू’ या टॅगलाईनने चित्रपटाच्या कथानकाची कल्पना येते. चित्रपट मूळ प्रेम कथेवर आधारित आहे. कॉलेजमधलं प्रेम पुढे टिकतं का? बबलीला तिचं प्रेम मिळतं का? या प्रश्नांची उकल चित्रपटात होणार आहे. यामुळे चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बबली
बबली

गगन गजरलवार, मानसी सुभाष, विवान वैद्य, अनिरुद्ध चौथमोल ही चित्रपटातील स्टार कास्ट आहेत. ‘बबली’ चित्रपटाला प्रकाश प्रभाकर यांनी संगीत दिले आहे. स्वप्नील बांदोडकर, मोहम्मद इरफान आणि वैशाली माडे, सरोदी बोरा आणि प्रकाश प्रभाकर यांनी चित्रपटाची गाणी गायिली आहेत. चेतन रघू चौधरी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

प्रदीप कुमार वर्मा यांनी सहदिग्दर्शन, शिवा राव यांनी छायांकनाची जबाबदारी पेलली आहे. सिद्धेश प्रभू यांनी चित्रपटाचे संकलन केलंय. बबली या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता योगेश डगवार आहेत. नृत्यदिग्दर्शक मयूर अहिरराव यांनी काम पाहिले आहे. चित्रपटाचे एडिटर सिद्धेश प्रभू आहेत.

कलाकारांचं कॉसच्यूम डिझायनिंग प्रीती चौधरी यांनी केलंय. कपिल जोशी चित्रपटाचे कलादिग्दर्शक आहेत. नवनीत वर्मा यांनी प्रॉडक्शन व्यवस्थापकाची जबाबदारी सांभाळली आहे. शेषपाल गनवीर यांनी संहिता प्रमुख काम पाहिले आहे. तुषार गिऱ्हे आणि तुषार मोरे चित्रपटाचे असिस्टंट दिग्दर्शक आहेत.

हेही वाचा : 

Back to top button