उत्तर प्रदेशमध्ये पुढीलवर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या हस्ते आज राज्यात प्रतिज्ञा यात्रेला ( Pratigya Yatra ) प्रारंभ होणार आहे. राज्यातील घरोघरी काँग्रेसला पोहचविण्यासाठी १२ हजार किलोमीटरची 'हम वचन निभाएंगे' ही प्रतिज्ञा यात्रा काढली जाईल, अशी घोषणा मागील महिन्यात प्रियांका गांधी यांनी केली होती.
आज बाराबंकीमध्ये प्रतिज्ञा यात्रेला ( Pratigya Yatra ) प्रियांका गांधी यांच्या हस्ते प्रारंभ होईल. ही यात्रा एकाचवेळी तीन ठिकाणांहून निघेल. बाराबंकीबरोबरच हारनपूर आणि वाराणसीमध्ये यात्रेचा शुभारंभ होईल. या यात्रेवेळी प्रियांका गांधी सात संकल्प घोषित करतील, अशी माहिती पक्षाचे छतीसगडचे प्रभारी पीएल पुनिया यांनी दिली.
वाराणसी येथून सुरु होणारी प्रतिज्ञा यात्रा चंदौली, सोनभद्र, मिर्जापूर, प्रयागराज, प्रतापगढ व अमेटी असा प्रवास करत रायबरेली येथे या यात्रेची सांगता होईल. बाराबंकी येथे सुरु होणारी यात्रा लखनौ, उन्नाव, फतेहपूर, चित्रकूट, बांदा, हमीरपूर आणि जालौन जिल्ह्यातून झांसी येथे यात्रेची सांगता होणार आहे. सहारनपूर येथे सुरु होणारी यात्रा मुजफ्फरनगर, बिजनौर, मुरादाबा, रामपूर, बरेली, बदायूं, अलीगढ, हाथरस, आग्रा मार्गे मथुरा येथे यात्रेची सांगता होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत महिलांना ४० टक्के उमेदवारी, विद्यार्थ्यांना स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक स्कुटी देण्याची प्रतिज्ञा केली आहे, अशी माहिती माजी मंत्री नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी दिली.
हेही वाचलं का?