Leonardo DiCaprio Dating Neelam Gill : टायटॅनिकचा जॅक देशी रोझच्या प्रेमात; लिओनार्डो डीकॅप्रिओ पंजाबी मॉडेलला करतोय डेट | पुढारी

Leonardo DiCaprio Dating Neelam Gill : टायटॅनिकचा जॅक देशी रोझच्या प्रेमात; लिओनार्डो डीकॅप्रिओ पंजाबी मॉडेलला करतोय डेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : टायटॅनिक हा हॉलिवूड चित्रपट भारतियांना सर्वश्रूत आहेच. त्यातील जहाजावरील अभिनेता आणि अभिनेत्रीची दोन्ही हात पसरलेली पोज तर सर्वांना माहितच आहे. आज ही अनेक प्रेमी युगलांना त्या आयकॉनीक पोझची कॉपी करण्याचा मोह आवरत नाही. हे सर्व सांगण्याचा उद्देश म्हणजे त्या चित्रपटातील जॅक अर्थात अभिनेता लिओनार्डो डीकॅप्रिओ हा सध्या चक्क पंजाबी मॉडेलच्या प्रेमात पडल्याचे बोललं जात आहे. इतकचं नाही तर त्यांना अनेकवेळा एकत्र पाहण्यात आले आहे. डीनर नाईट ऑऊटसह अनेक ठिकाणी ते सध्या एकत्र दिसत आहेत, त्यामुळे सर्वत्र एकच चर्चा आहे की, टायटॅनिकचा जॅक चक्क भारतीय म्हणजे पंजाबी कुडीच्या प्रेमात पडला आहे. (Leonardo DiCaprio Dating Neelam Gill)

अभिनेता लिओनार्डो डीकॅप्रिओ सध्या डेटींगच्या बातम्यांनी पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आला आहे. ४८ वर्षांचा लिओनार्डो २८ वर्षांच्या मुळच्या भारतीय असणाऱ्या ब्रिटीश मॉडेल नीलम गीलच्या प्रेमात पडल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. अलिकडेच दोघांना लंडनच्या चिल्टन फायरहॉऊसमध्ये पाहण्यात आले. या ठिकाणी नीलम सोबत तीची आई सुद्धा उपस्थित होती. याशिवाय नीलम गील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सुद्धा दिसली होती. जेथे लिओनार्डो त्याचा ‘किलर्स ऑफ द फ्लावर’ या नव्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी पोहचला होता. (Leonardo DiCaprio Dating Neelam Gill)

कोण आहे नीलम गील (Leonardo DiCaprio Dating Neelam Gill)

नीलम गील ही मूळची भारतीय असून ती ब्रिटीश मॉडेल आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील बायोमध्ये ब्रिटीश पंजाबी मॉडेल असे म्हटले आहे. सोशल मीडियामध्ये नीलम गीलची तगडी फॅनफॉलोईंग आहे. तिच्या इन्टा अकाउंटवर तिचे अनेक बोल्ड आणि हॉट फोटाज पहायला मिळतात. नीलमचा जन्म २७ एप्रिल १९९५ साली इंग्लंडमध्ये झाला आहे आणि २००४ पर्यंत ती लंडनमध्ये रहात होती. तिचे आजी-आजोबा भारतातील असून ती एका शिख कुटुंबातून येते. नीलम गील स्वत:चं एक युट्यूब चॅनल सुद्धा चालवते. या चॅनलद्वारे बुलिंग, डिप्रेशन आणि बॉडि कॉन्फीडन्स सारख्या मुद्द्यांवर बोलत असते व मार्गदर्शन करते.

आता राहता राहिली टायटॅनिकचा नायक लिओनार्डोची गोष्ट तर नीलमच्या आधीसुद्धा त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे. लियोनार्डो या आधी कॅमिला मोरान हिला डेट करत होता. त्यानंतर सुपरमॉडेल गिगी हदीद हिला सुद्धा तो डेट करत असल्याच्या बातम्या मध्यंतरी येत होत्या. आता तो पंजाबी मॉडेल नीलममध्ये गुंतल्याच्या चर्चा आहेत. चला तर मग पाहुया विदेशी जॅक आणि देशी रोझची काही जोडी जमते का?


अधिक वाचा :

Back to top button