Meta microblogging : Meta देणार Twitter ला टक्कर; जूनच्या अखेरीस मेटा मायक्रोब्लॉगिंग साईट सुरू करणार? रिपोर्ट | पुढारी

Meta microblogging : Meta देणार Twitter ला टक्कर; जूनच्या अखेरीस मेटा मायक्रोब्लॉगिंग साईट सुरू करणार? रिपोर्ट

पुढारी ऑनलाईन: फेसबुकची मूळ कंपनी मेटाकडून आज (दि.०६) मोठी घोषणा करण्यात आली आहे. ट्विरच्या (Twitter) धर्तीवर मेटा ही टेक कंपनी देखील स्वतंत्र मायक्रोब्लॉगिंग साइट सुरू करण्याची योजना आखत आहे. मेटाची ही नवीन सेवा लवकरच म्हणजे जूनच्या अखेरीस सुरू होणार आहे, अशी घोषणा मेटाकडून नुकतीच करण्यात आली आहे. यामुळे ट्विटरला स्पर्धा होणार असल्याच शक्यता एका रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे, असे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मायक्रोब्लॉगिंगसाठी नव्याने तयार करण्यात येत असलेल्या साईटचे कोडनेम बार्सिलोना असे आहे. ही साईट इन्स्टाग्रामशी जोडली जाणार आहे. या मायक्रोब्लॉगिंग साईटवरील एका पोस्टमध्ये ५०० शब्दांची मर्यादा असणार आहेत. या मायक्रोब्लॉगिंग साईटचा वापर करताना यूजर्स अगदी सहजरित्या मेटा सारख्या इतर सोशल मीडिया साईटवरील फोटो, व्हिडिओ देखील बदलू शकतात, असे देखील कंपनीने म्हटले आहे.

मेटाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या मायक्रोबलॉगिंग साईटची चाचणी करण्यात येत आहे. यामधील काही दोष आहे का? हे देखील तपासले जात आहे. सध्या ट्विटर आपल्या प्लॅटफॉर्मवर यूजर्स टिकवण्यासाठी धडपडत आहे. यामध्येच मेटाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा:

 

Back to top button