ब्रिजभूषण सिंह विरोधात दोन एफआयआरसह १० तक्रारी; लैंगिक छळाचे आरोप| Wrestlers Protest FIR Against Brijbhushan Singh

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या दोन्ही एफआयआर समोर आल्या आहेत. एफआयआरमध्ये ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध छेडछाड आणि लैंगिक छळाच्या एक किंवा दोन नव्हे तर १० प्रकरणांचा उल्लेख आहे. यामध्ये ब्रिजभूषण यांच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. ब्रिजभूषण यांनी अनेकदा त्यांचा विनयभंग केल्याचे खेळाडूंनी म्हटले आहे. (Wrestlers Protest FIR Against Brijbhushan Singh)
तक्रारींमध्ये अयोग्य स्पर्श करणे, छातीवर हात ठेवणे किंवा कोणत्याही सबबीखाली हात ठेवण्याचा प्रयत्न करणे, पाठलाग करणे यांचा समावेश होतो. २१ एप्रिल रोजी कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात (Delhi Police)तक्रार दिली होती. कुस्तीपटू सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर दिल्ली पोलिसांनी २८ एप्रिलला दोन वेगवेगळे एफआयआर नोंदवले. या दोन्ही एफआयआरच्या प्रती समोर आल्या आहेत. (Wrestlers Protest FIR Against Brijbhushan Singh)
या कलमान्वये गुन्हा दाखल (Wrestlers Protest FIR Against Brijbhushan Singh)
२८ एप्रिल रोजीच्या दोन्ही एफआयआरमध्ये IPC कलम ३५४ (महिलांना तिची शालीनता भंग करण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी), ३५४A (लैंगिक छळ), 354D (पाठलाग करणे) आणि 34 (सामान्य हेतू) उद्धृत केले आहे. या आरोपांमध्ये एक ते तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. पहिल्या एफआयआरमध्ये सहा प्रौढ कुस्तीपटूंवरील आरोपांचा समावेश आहे. यामध्ये भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) सचिव विनोद तोमर यांचेही नाव आहे.
पोक्सो प्रकरणात ५ वर्षांची शिक्षा
अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हे POCSO कायद्याच्या कलम १० अंतर्गत आहे, ज्यामध्ये पाच ते सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. एफआयआरमध्ये नमूद केलेल्या घटना २०१२ ते २०२२ या कालावधीत देशाच्या विविध भागात आणि परदेशात घडल्या.
ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई का नाही – प्रियांका गांधी
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील आरोपांसंदर्भातील एका वृत्ताचा हवाला देत आरोपीला का वाचवले जात आहे आणि त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवाल केला. प्रियांका गांधी यांनी कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षांवर लावण्यात आलेल्या आरोपांवर ट्विट करताना पंतप्रधानांना थेट प्रश्न विचारला, ‘नरेंद्र मोदी जी, हे गंभीर आरोप वाचा आणि देशाला सांगा की आतापर्यंत आरोपींवर कारवाई का झाली नाही.’
…@narendramodi जी इन गंभीर आरोपों को पढ़िए और देश को बताइए कि आरोपी पर अभी तक कोई कार्रवाई क्यों नहीं हुई? pic.twitter.com/ayQ0aiszJV
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) June 2, 2023
अधिक वाचा :