Upcoming Web Shows : नेटिझन्सना उत्सुकता वेब शोची! फॅमिली मॅन ते दुरंगापर्यंत पाहता येणार नव्या सीरीज

duranga
duranga
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनोज बाजपेयींच्या फॅमिली मॅनपासून अमित साधच्या दुरंगापर्यंत असे अनेक वेबशो च्या नव्या सीझन पाहण्यासाठी नेटिझन्स उत्सुक आहेत. (Upcoming Web Shows ) ओटीटी शोने त्याच्या आकर्षक कथा आणि प्रेक्षकांचा मूड ओळखून अनेक नवीन वेब शो ओटीटीवर रिलीज केले. प्रेक्षकांना त्यांच्या वेळेनुसार हवं ते बघता यावं उत्तम कथाचा आनंद घेता यावा यासाठी अनेक वेब सीरीज सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. गेल्या तीन वर्षात काही आकर्षक आणि तितक्याच लक्षवेधी वेब शो प्रेक्षकांनी पाहिले आणि आता लवकरच त्यांचे नवीन सीझन येणार आहेत ज्याची सगळेच आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. (Upcoming Web Shows )

फॅमिली मॅन सीझन ३

द फॅमिली मॅनचा पहिला आणि दुसरा सीझन यशस्वी ठरल्यानंतर लवकरच याचा तिसरा सीझन येणार आहे. अभिनेता मनोज बाजपेयी हे श्रीकांत तिवारी म्हणून घराघरात प्रसिद्ध झाले, जो एक मध्यमवर्गीय माणूस आहे जो गुप्तपणे थ्रेट अॅनालिसिस अँड सर्व्हिलन्स सेल (TASC) साठी गुप्तचर अधिकारी म्हणून काम करतो. सामंथा रुथ प्रभू हिने प्रतिपक्षाची भूमिका साकारल्याने दुसरा सीझन देखील तितकाच उत्साह वर्धक ठरला. आता चाहते तिसरा सीझन प्रसारित होण्याची आणि बाजपेयी पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये पाहण्याची प्रेक्षक वाट बघतात.

मेड इन हेवन सीझन २

तारा आणि करण, दिल्लीतील दोन वेडिंग प्लॅनर, 'मेड इन हेवन' या कंपनीचे मालक आहेत. या मालिकेने प्रेक्षकाची मनं तर जिंकली आणि प्रेक्षकांना आपलंसं करून घेतलं. आता प्रेक्षक तारा आणि करणच्या आयुष्यात पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहे.

मिर्झापूर सीझन ३

मिर्झापूरचा पहिला सिझन झटपट हिट झाला. इंडस्ट्रीतील काही सर्वोत्कृष्ट कलाकारांची कलाकृती यातून सगळ्यांनीच अनुभवली. या क्राईम अ‍ॅक्शन थ्रिलरने हा वेब शो सुपरहिट ठरला.

आर्या सीझन ३

सुष्मिता सेन सारख्या उत्तम अभिनेत्रीने या प्रोजेक्टचे नेतृत्व केल्याने, आर्या कमालीची वेब सीरिज असणार, यात शंका नाही. सेनला शहरातील नवीन लेडी-डॉन म्हणून ओळखल जातंय आणि आता प्रेक्षक तिसरा सीझन येण्याची आतुरतेने वाट बघतात.

दुरंगा सीझन 2

दुरंगाचा सीझन १ इतका लोकप्रिय ठरल्यानंतर लवकरच या वेब शो चा नवीन सीझन येणार आहे. गुलशन देवैया आणि दृष्टी धामी यांच्या मोहक कामगिरीसह, अभिनेता अमित साधने 'दुरंगा' सीझन १ मध्ये एक कमालीचा कॅमिओ केला होता आणि त्याला प्रेक्षकांकडून आणि निर्मात्यांकडून खूप प्रेम मिळालं. आता अमित दुरंगा सीझन २ मध्ये एक मनोरंजक भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाल्याचं समजतंय. या सीझनमध्ये त्याचे पात्र कसं असणार आहे या साठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news