10 Years @Yeh Jawaani Hai Deewani : 'माझ्या हृदयाचा तुकडा', एक्स बॉयफ्रेंडसोबत दीपिका रोमँटिक | पुढारी

10 Years @Yeh Jawaani Hai Deewani : 'माझ्या हृदयाचा तुकडा', एक्स बॉयफ्रेंडसोबत दीपिका रोमँटिक

Yeh Jawaani Hai Deewani 10 Years: दीपिका पादुकोण – रणबीर कपूरचा ‘ये जवानी है दीवानी’ (Yeh Jawaani Hai Deewani) चित्रपट रिलीज होऊन १० वर्षे झाली आहेत. या खास औचित्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाचे काही सीन्सचे फोटो शेअर केले आहेत. खास बाब म्हणजे या सीन्समध्ये तिने एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत रोमँटिक पोझमध्ये आहे. इतकचं नाही तर अभिनेत्रीने या सीन्स शेअर करत जी कॅप्शन लिहिली आहे, ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

दीपिकाने शेअर केले फोटोज

‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटातील दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली. या चित्रपटात दीपिका एक हुशार विद्यार्थिनी ते ग्लॅमरस लूकमध्ये दिसली होती, तर रणबीर बनी बनून जग फिरायला गेला होता. या चित्रपटातील काही दृश्यांची झलक अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. फोटो शेअर करत लिहिले- ‘माझ्या हृदयाचा तुकडा…’. दुसऱ्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले- ‘And Soul…’

दीपिका पदुकोणने चित्रपटातील काही दृश्यांचे फोटो शेअर केले आहेत. तर चित्रपटाचा निर्माता करण जोहरने चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना करण जोहरने लिहिले- ‘वेळ कसा निघून जातो हे तुम्हाला कळत नाही…विशेषत: जेव्हा ये जवानी है दिवानी चित्रपट येतो…जे कधीच जुने होऊ शकत नाही. ही एक खास कथा आहे जी केवळ लोकांच्या हृदयातच जात नाही तर तरुण पिढीलाही जोडते… किती छान टीम आहे ज्याने हा चित्रपट इतक्या अप्रतिम पद्धतीने बनवला आहे.’

बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडले

‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर उत्तम कलेक्शन केले आणि अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले. हा चित्रपट अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला होता.

Back to top button