Priyanka Chopra : ग्लोबल स्टार प्रियांकाचा सिटाडेल सीझन -२ लवकरच येणार | पुढारी

Priyanka Chopra : ग्लोबल स्टार प्रियांकाचा सिटाडेल सीझन -२ लवकरच येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रियांका चोप्रा जोनास आणि रिचर्ड मॅडन यांच्या सिटाडेल या वेब सीरीजने २०० देशांमध्ये जागतिक स्तरावर प्रचंड यश मिळवले आहे. यातील अनेक दमदार सीन्सने एपिसोडमध्ये अनेक ट्विस्टने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. प्रेक्षकांनी प्रत्येक एपिसोडनंतर नादिया सिंहच्या भूमिकेत असलेल्या प्रियांकाचे कौतुक केले. (Priyanka Chopra) सोशल मीडियावर या सीरिजच्या चर्चा होताना दिसतात. पहिल्या सीझनचा शेवटचा एपिसोड आज रिलीज होत असताना, प्रियांकाने अधिकृतरित्या सिटाडेलचा दुसरा सीझन सुरू असल्याचं सांगितलं. (Priyanka Chopra)

Priyanka Chopra
Priyanka Chopra

जो रुसोने प्रत्येक एपिसोडला एक खास वळण कसं दिलं याबद्दल या पोस्टमध्ये प्रियांकाने सांगितलं आहे. प्रियांकाने या भूमिकेसाठी खास मेहनत घेतली असून तिला खर्‍या आयुष्यात दुखापतीही झाली नादियाच्या भूमिकेत योग्यरित्या काम करण्यासाठी प्रियांकाने सहा वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व मिळवले.

प्रियांका 2023 मध्ये अनेक नवीन भूमिकेमध्ये दिसणार आहे. मेट गाला लूक, सिटाडेलमधील अॅक्शन, लव्ह अगेनचे यश आणि बरेच प्रोजेक्ट प्रियांकाकडे आहे. सिटाडेल व्यतिरिक्त प्रियांकाकडे राज्यप्रमुख आणि जी ले जरा या आगामी चित्रपट आहेत.

Back to top button