रिताभरी चक्रवर्तीचा फटाफाटी चित्रपट संपूर्ण भारतात रिलीज होणार | पुढारी

रिताभरी चक्रवर्तीचा फटाफाटी चित्रपट संपूर्ण भारतात रिलीज होणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिताभरी चक्रवर्ती हिच्या बंगाली चित्रपटाने फटाफटी बॉक्स ऑफिसवरवर उत्तम कमाई केल्यानंतर हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती समजते. बंगाली चित्रपटांमध्येही हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

विविध भाषांमध्ये चित्रपट आणि लघुपटांमध्ये आपल्या कामाची जादू दाखवल्यानंतर अभिनेत्री रिताभरी चक्रवर्तीने फटाफटीसाठी फुलोरा भादुरी या पात्रासाठी खूप मेहनत घेतली हा चित्रपट तिच्या साठी एक अनोखा अनुभव देणारा ठरला. या अभिनेत्रीने तिच्या भूमिकेसाठी तब्बल तिचा 25 किलो वजन वाढवले आणि ही भूमिका साकारली. रिताभरी, एक पॉवर परफॉर्मर, स्टिरियोटाइप च्या पलिकडे जाऊन काम करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. समीक्षक आणि प्रेक्षकांनीही अबीर चॅटर्जीसोबतच्या तिच्या केमिस्ट्रीचे कौतुक केले आहे.

रिताभरी चक्रवर्ती ही पहिल्यांदाच अबीर चॅटर्जीसोबत दिसली. या चित्रपटात स्वस्तिका दत्ता, सोमा चक्रवर्ती, रक्तीम सामंता, अरिजिता मुखोपाध्याय, देबोश्री गांगुली, संघश्री सिन्हा, अस्मी घोष आणि लोकनाथ डे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट नंदिता रॉय, शिबोप्रसाद मुखर्जी यांनी सादर केला आहे आणि विंडोजने निर्मिती केली आहे. फटाफाटीचे दिग्दर्शन अरित्रा मुखर्जी यांनी केले आहे.

Back to top button