Cannes: सनी लिओनी केनेडी चित्रपट प्रीमियरमध्ये झळकली, ब्लॅक आऊटफिटमध्ये अदा | पुढारी

Cannes: सनी लिओनी केनेडी चित्रपट प्रीमियरमध्ये झळकली, ब्लॅक आऊटफिटमध्ये अदा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सनी लिओनी तिच्या केनेडी चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये झळकली. (Cannes) अनुराग कश्यप दिग्दर्शित केनेडी या चित्रपटाने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. केनेडी हा असा एक चित्रपट आहे, ज्यात सनी लिओनीने तिच्या अनेक भूमिकेच्या पलिकडे जाऊन ही भूमिका साकारली आहे. (Cannes)

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचे स्क्रिनिंग नुकतेच पार पडले. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाने प्रेक्षकांचे स्टँडिंग ओव्हेशन मिळवले आणि हाच खास क्षण सनीसाठी अनोखा सोहळा होता.

अभिमानाने आनंद व्यक्त करत सनी लिओनी, दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि सह-कलाकार राहुल भट यांच्यासोबत कान्समध्ये खास फोटो पोझ दिली.

कान्समध्ये चित्रपटाच्या उत्तुंग यशाने भारतीय प्रेक्षकांमध्ये या चित्रपटासाठी खूप उत्सुकता आहे. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांकडून मिळालेली जागतिक प्रशंसा आणि जबरदस्त प्रतिसाद यामुळे उत्साह वाढला आहे. ज्यामुळे देशभरातील चाहत्यांसाठी एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव मिळेल.

केनेडी हा असा एक चित्रपट आहे ज्यात सनीच्या अभिनयाची अनोखी झलक बघायला मिळणार आहे. आकर्षक कथा आणि उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. भारतीय प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे चाहते सनी लिओनीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

Back to top button