सोनू सूदच्या ‘फतेह’ साठी चाहते उत्सुक, अभिनेता स्वत: करणार स्टंट | पुढारी

सोनू सूदच्या 'फतेह' साठी चाहते उत्सुक, अभिनेता स्वत: करणार स्टंट

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘फतेह’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे चित्रीकरण चर्चेचा विषय ठरला आहे. कारण आहे स्टंट ॲक्सन्स. सोनू सूद स्वत: ॲक्शन्स सीन्स करणार असल्याने चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळत आहे. अलीकडेच सोनूचा एक व्हिडिओ रिलीज झाला असून एक अनोखी झलक बघायला मिळाली. यामुळे आता सगळेच सोनूच्या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

शूटिंग शेड्यूलमधून वेळ काढून अभिनेता त्याच्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी खास वेळ देतो. ‘फतेह’ मध्‍ये प्रमुख भूमिका साकारत असलेल्या सोनू सूदने त्याच्या चाहत्यांना दीर्घकाळ वाट बघायला लावली. आता या चित्रपटाच्या शूटची एक झलक सगळ्यांना बघायला मिळतेय.

सिनेमाचा अनुभव आणखी जीवंत करण्यासाठी सोनू सूदने एका खास टीमच्या मदतीने वैयक्तिकरित्या धाडसी स्टंट करण्याची जवाबदारी स्वीकारली आहे. ‘फतेह’ हा सोनू सूदचे झी स्टुडिओज आणि शक्ती सागर प्रॉडक्शनच्या सहकार्याने बनवलेले होम प्रोडक्शन आहे, ज्यामध्ये सोनू सूद आणि जॅकलीन फर्नांडिस हे मुख्य कलाकार दिसणार आहेत.

Back to top button