दिशाचा सिझलिंग व्हिडीओ व्हायरल! | पुढारी

दिशाचा सिझलिंग व्हिडीओ व्हायरल!

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटनी हिने आपल्या सिझलिंग डान्सचा पोस्ट केलेला व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. अव्वल आऊटफिट व मॉडेलिंगसाठी ओळखली जाणारी दिशा या ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत असतात. त्याचाच दाखला आताही मिळतो आहे. ऑल ब्लॅक इन्सेंबलमध्ये लक्ष वेधून घेणार्‍या दिशासमवेत या व्हिडीओत स्टेजवर बॅकग्राऊंड डान्सर्स दिसून आले. नेटिझन्सनी दिशाच्या सिझलिंग डान्सवर भरभरून प्रतिक्रिया देणे साहजिकच होते.

दिशाचे इन्स्टाग्रामवर प्रचंड फॉलोअर्स असून अलीकडेच तिचा ब्लॅक ब्रॅलेटमधील ड्रॉप-डेड सेल्फी बराच व्हायरल झाला होता. एरवी, दिशा आपल्या चित्रपटापेक्षाही मॉडेलिंगमुळेच अधिक प्रकाशझोतात असते, याचा आणखी एकदा दाखला यावेळी मिळाला आहे. सातत्याने एकापेक्षा एक फोटोसेशन करत असल्याने तिला बिकनी बेब, असा टॅगही लाभला आहे.

Back to top button