‘रॉकी और रानी’चा फर्स्ट लूक! | पुढारी

‘रॉकी और रानी’चा फर्स्ट लूक!

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मागील वर्षापासून चर्चेत आहे. दिग्दर्शक करण जोहरने आपल्या वाढदिवसाच्या औचित्याने आलिया भट्ट व रणवीर सिंह यांचा फर्स्ट लूक जारी केला आहे. या चित्रपटाची चाहत्यांना प्रदीर्घ प्रतीक्षा राहत आली असून चित्रीकरणादरम्यानचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाले आणि चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली गेली. करणने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाची काही छायाचित्रे शेअर केली.

आलिया यातील बहुतांश छायाचित्रांत साडीमध्ये दिसून आली, तर रणवीर वेस्टर्न व फंकी लूकमध्ये दिसून आला आहे. या दोघांचा लूक पाहता आलिया देसी गर्ल व रणवीर बॅड बॉयच्या इमेजमध्ये असेल, असे चित्र आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने करण जोहर तब्बल 7 वर्षांनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनात उतरला आहे. रणवीर व आलियासह यात धर्मेंद्र, जया बच्चन व शबाना आझमी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 28 जुलै रोजी रीलिज होईल.

Back to top button