Imran Khan : इम्रान खान यांना पुन्हा बसला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडला पक्ष | पुढारी

Imran Khan : इम्रान खान यांना पुन्हा बसला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडला पक्ष

इस्लामाबाद; पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना सातत्याने धक्के बसत आहेत. आता इम्रानच्या जवळचे आणि त्यांच्या सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनीही बुधवारी पक्षाचा राजीनामा दिला. 9 मे रोजी झालेल्या हिंसाचारानंतर सरकार सातत्याने पीटीआयच्या नेत्यांवर ताशेरे ओढत आहे. यामुळे इम्रान खान यांचे (Imran Khan) इम्रान खान यांना पुन्हा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याने सोडला पक्ष जवळचे मित्र पक्ष सोडत आहेत.

इम्रान खान यांच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री असलेले फवाद चौधरी यांनी ट्विट केले की, माझ्या आधीच्या वक्तव्यात मी 9 मे च्या घटनांचा स्पष्टपणे निषेध केला होता, मी राजकारणातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे मी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि इम्रान खान यांच्यापासून वेगळे होत आहे. (Imran Khan)

फवाद चौधरी यांनी इम्रान सरकारच्या काळात माहिती आणि प्रसारण आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणून काम पाहिले. ते पीटीआयचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्तेही होते. (Imran Khan)

तत्पूर्वी, पीटीआयच्या ज्येष्ठ नेत्या शिरीन मजारी यांनी मंगळवारी तहरीक-ए-इन्साफ पक्ष सोडला आणि संरक्षण आस्थापनांवर हल्ला करणाऱ्या माजी पंतप्रधानांच्या समर्थकांना फटकारले. इम्रान खान यांच्या राजवटीत शिरीन मजारी यांनी 2018 ते 2022 पर्यंत मानवाधिकार मंत्री म्हणून काम केले होते.

शिरीन मजारी यांनी 12 मे पासून चौथ्यांदा अटकेतून मुक्त झाल्यानंतर सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली, 9 मे रोजी झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात पोलिसांनी त्यांना त्यांच्या राहत्या घरातून उचलले आणि तुरुंगात पाठवले. न्यायालयाच्या आदेशाने तुरुंगातून सुटल्यानंतर काही तासातच सोमवारी मजारी यांना पुन्हा अटक करण्यात आली. लाहोर उच्च न्यायालयाच्या रावळपिंडी खंडपीठाने इतर कोणत्याही प्रकरणात मजारीची आवश्यकता नसल्यास त्यांची सुटका करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते.


अधिक वाचा :

Back to top button