अमित साधचा लघुपट ‘घुसपैठ’ फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांना समर्पित | पुढारी

अमित साधचा लघुपट ‘घुसपैठ’ फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांना समर्पित

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेते अमित साध, ज्याने वेब सीरीज आणि चित्रपटांमध्ये काही उत्तम भूमिका साकारल्या आणि त्याच्या प्रभावशाली अभिनयाने अष्टपैलू परफॉर्मन्स ने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बोस्टन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘घुसपैठ’ प्रदर्शित करण्यात आला.

नवीन लघुपटाबद्दल साध म्हणाला, “मी या प्रकल्पाचा एक भाग झालो याचा मला खूप आनंद आहे. जेव्हा मिहिरने मला चित्रपटासाठी विचारलं तेव्हा त्याची माझ्यासोबत काम करण्याची तयारी आणि उत्साहाने माझं मन जिंकलं. म्हणूनच मी घुसपैठला हो म्हणालो. त्याचा पहिला दिग्दर्शकीय उपक्रम म्हणून त्याने उत्कृष्ट काम केले आहे. आम्ही हा चित्रपट दानिश सिद्दीकी सारख्या फोटो पत्रकारांना समर्पित केला आहे.

अमित घुसपैठबद्दल उत्साही असल्याने, त्याच्याकडे या वर्षात अनेक उत्तोत्तम प्रोजेक्ट्स आहेत आणि त्याचे चाहते त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्याची उत्सुक आहेत. कारण त्याच्याकडे मेन, पुणे हायवे, दुरंगा 2 आणि आणखी काही असे काही प्रोजेक्ट आहेत. त्यापैकी काही या वर्षी रिलीज होणार असल्याचे समजते.

Back to top button