

मुंबई; पुढारी ऑनलाईन: छोट्या पडद्यावर लोकप्रिय 'आई कुठे काय करते' ( 'Aai Kuthe Kay Karte' ) या मालिकेने खूपच कमी कालावधीत तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. सध्या या मालिकेतून ('Aai Kuthe Kay Karte' ) अरूधंतीचा मुलगा यश बाहेर पडणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेत अरूधंतीचा मुलगा यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुखने साकारली आहे. सध्या अभिषेक हा आपल्या कुटुंबासोबत लंडनमध्ये सुट्यांचा आनंद घेत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अभिषेक या मालिकेत दिसणार नाही.
अभिषेक देशमुख लंडनमधील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत लंडनमधील एका मंदिरासमोर काही लोक दिसत आहेत. दुसऱ्या एका फोटोत तेथील काही रस्ते दिसत आहेत. यामुळे 'आई कुठे काय करते' या मालिकेतून यश म्हणजे अभिनेता अभिषेक देशमुख काही दिवसांसाठी एक्झिट होणार असल्याचे समजते आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेचे नवनविन ट्विटस् पाहायला मिळत आहेत. ही मालिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकेत एका बाजूला अरुंधतीने घराचा काही हिस्सा गहाण ठेवल्याचे देशमुख कुटुंबाला समजले आहे.
तर दुसरीकडे अरुंधतीचा मुलगा यश काही कामानिमित्त १० दिवस बाहेरगावी जाणार असल्याचे दाखवले जात आहे. या मालिकेत अरूधंतीचा लाडका मुलगा यश असून तो नेहमी तिच्या पाठिशी खंबीरपणे उभा असतो. परंतु, यश हा मालिकेत दिसणार नसल्याने चाहत्याच्यात मात्र नाराजी पसरली आहे.
हेही वाचलंत का?