स्वप्नील जोशी-शिवानी सुर्वेचा वाळवी चित्रपटाचा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर | पुढारी

स्वप्नील जोशी-शिवानी सुर्वेचा वाळवी चित्रपटाचा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ती म्हणजे ”नवा गडी नवं राज्य’चा राघव अचानक काहीतरी वेगळचं असं बोलतोय आणि वागतोय. त्याच्या घरातील टीव्हीची तो जिवा पलीकडे काळजी घेतो आहे, तो घरातील कोणालाच टीव्हीला हात सुद्धा लावू देत नाही आहे. राघव आपली बहीण वर्षा हिला सुद्धा टीव्ही लावू नको असा बजावतो आणि ह्या त्याच्या वागण्याचे वर्षा कारण विचारते. तर तो असे काहीतरी सांगतो की वर्षा सुद्धा गहन विचारात पडते. परत वर्षा राघवला टीव्ही न लावायचं कारण विचारते तेव्हा राघव मोठ्या काळजीने सांगतो की टीव्हीला जपायला हवे कारण टीव्हीला वाळवी लागणार आहे. हे एकूण वर्षा चक्रावूनच जाते. प्रेक्षकहो हे एकूण तुम्ही सुद्धा चक्रावलात ना !!

झी स्टुडिओज निर्मित ‘वाळवी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घातला आणि आता लवकरच म्हणजे येत्या १८ जूनला, संध्या. ७ वाजता त्याचा ‘वर्ल्ड टीव्ही प्रीमियर’ झी मराठीवर भेटीस येणार आहे. कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. परेश मोकाशी दिग्दर्शित या चित्रपटात ‘स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव’ हे प्रमुख भूमिकेत आहेत. लाकडाला वाळवी लागली तर ती लाकूड पोखरून काढते ह्याचा प्रकारे जर नात्यानं वाळवी लागली तर काय होते हे प्रेक्षकांना बघायला मिळेल.

Back to top button