इमरान हाश्मीचा जन्नत आजही आठवतो, १५ वर्षांनंतरही हिट

emraan hashmi
emraan hashmi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इमरान हाश्मीने अनेक गाणी सुपरहिट ठरली. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीपैकी, जन्नत हा एक चित्रपट होता. या चित्रपटाला १५ वर्षे पूर्ण झाली. याविषयी तो म्हणतो, "15 वर्षे कुठे गेली? तो अजूनही नॉस्टॅल्जिक आहे. जन्नत हादेखील माझ्या आवडत्या प्रोजेक्टपैकी एक आहे, ज्यावर काम केले आहे. चाहत्यांनी देखील चित्रपटावर खूप प्रेम केले आणि मला अजूनही आठवते की गाणी हिट ठरली होती.

इमरान हाश्मी स्टारर चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि बॉक्स ऑफिसवर तो प्रचंड हिट ठरला. या चित्रपटाची क्रेझ इतकी जास्त होती की निर्मात्यांनी २०१२ मध्ये त्याचा सिक्वेल – जन्नत २ रिलीज केला. बॉक्स ऑफिसवर निश्चितपणे जबरदस्त यश मिळवणाऱ्या फ्रेंचायझी बनवण्याच्या बाबतीत इमरान हाश्मी हे नाव आता प्राधान्याने पुढे येते. म्हणूनच जन्नत-३ ची मागणी आता होत असून प्रत्येकजण तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत.

इमरान हाश्मी शेवटचा अक्षय कुमारसोबत सेल्फी चित्रपटामध्ये दिसला होता. अभिनेता इमरानकडे आणखी काही प्रोजेक्ट असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news