‘आरआरआर’, ‘पुष्पा’ चित्रपट निर्मात्यांवर ‘ईडी’चा छापा | पुढारी

‘आरआरआर’, ‘पुष्पा’ चित्रपट निर्मात्यांवर ‘ईडी’चा छापा

चेन्नई : ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन’सारखे बड्या बजेटचे चित्रपट बनवणार्‍या ‘एलवायसीए’ प्रॉडक्शन हाऊसच्या चेन्नई येथील कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला. मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर ‘ईडी’ने या कंपनीच्या चेन्नईतील 8 कार्यालयांची झडती घेतली. ‘एलवायसीए’तर्फे अद्याप कारवाईबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रजनीकांतच्या ‘2.0’, ‘दरबार’ आणि मणिरत्नमच्या ‘पोन्नियिन सेल्वन 1’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन 2’ची निर्मिती याच कंपनीने केली आहे.

Back to top button