The Kerala Story : जम्मू-काश्मीरमध्ये दोन गटात वाद, ५ वैद्यकिय विद्यार्थी जखमी | पुढारी

The Kerala Story : जम्मू-काश्मीरमध्ये दोन गटात वाद, ५ वैद्यकिय विद्यार्थी जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘द केरल स्टोरी’ वरून वाद सुरु असताना जम्मू – काश्मीर (The Kerala Story) मध्ये वैद्यकिय अभ्यासक्रम शिकणारे दोन गट एकमेकांशी भिडले. यानंतर ५ मेडिकलचे विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन करत दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. सोबतच पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टी (PDP) च्या अध्यक्षा महबूबा मुफ्ती (The Kerala Story) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

महबूबा मुफ्ती म्हणाल्या, केंद्र सरकार हिंसा भडकवणाऱ्या चित्रपटांना प्रोत्साहित करत आहे. त्याचसोबत त्यांनी उपराज्यपाल मनोज सिन्हा (Manoj Sinha) यांना विनंती केलीय की, याप्रकरणी दोषींना शिक्षा मिळावी. घटनेनंतर एसएसपी यांनीही प्रकरणाचा तपास व्हायला पाहिजे, असे म्हटले आहे.

काय आहे घटना?

जम्मूतील राजकीय मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडली. बॉईज हॉस्टेलमध्ये द केरल स्टोरी चित्रपटावरून दोन गटात वाद होऊन ते एकमेकांशी भिडले. वादानंतर पाच विद्यार्थी जखमी झाले. दरम्यान, एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आणि दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. याशिवाय मेहबूबा मुफ्ती यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला.

Back to top button