The Kapil Sharma Show : शाहरुख खानबद्दल सुधा मूर्तिंचे मोठे वक्तव्य, दिलीप कुमार…

Sudha Murty
Sudha Murty
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इन्फोसिस फाऊंडेशनच्या संस्थापिका, लेखिका सुधा मूर्ती यांनी द कपिल शर्मा शो कार्यक्रमात हजेरी लावली. (The Kapil Sharma Show) यावेळी बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन, द एलिफेंट व्हिस्पर्स डॉक्युमेंट्रीच्या निर्माता गुनीत मोंगा यादेखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी सुधा मूर्ति यांनी चित्रपटाविषयी सांगितलं. सोबतचं शाहरुख खानबद्दल मोठं वक्तव्य केलं, जे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. (The Kapil Sharma Show)

सुधा मूर्ति चित्रपटांबद्दल सांगत होत्या. त्यांना चित्रपटाची आवड असून अनेक चित्रपट त्यांनी पाहिल्याचे संगितले. चित्रपटाविषयी प्रेम व्यक्त करताना त्या म्हणाल्या, 'मी आतापर्यंत अनेक चित्रपट पाहिले आहेत. रोज चित्रपट पाहण्याची माझ्याशी एकाने पैज लावली होती. मला आठवतं की, त्यावेळी मी पुण्यात होते. त्यामुळे मी रोज एक चित्रपट पाहिला…३६५ दिवस.'

शाहरुखबद्दल म्हणाल्या –

कार्यक्रमात सुधा मूर्ती यांनी त्यांच्या तरुणपणीच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या- 'माझे आवडते अभिनेते दिलीप कुमार होते. त्यांनी जो अभिनय केला, ते अन्य कुठल्याच अभिनेत्याला जमलं नाही. दिलीप कुमार यांच्यांनंतर तसा अभिनय फक्त शाहरुख खानच करू शकतो. दिलीप कुमार यांची जागा शाहरुखने घेतली आहे. सुधा मूर्ति म्हणाल्या, मी जेव्हा शाहरुखचा वीर जारा चित्रपट पाहिला तेव्हा माझ्या मुलीला सांगितलं की, जर दिलीपजी तरुण असते तर तेच या चित्रपटात दिसले असते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news