अदा नव्हे चामंडेश्वरी! | पुढारी

अदा नव्हे चामंडेश्वरी!

अभिनेत्री अदा शर्माचा ‘द केरला स्टोरी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. सिनेमात अदाने साकारलेल्या भूमिकेचीही चर्चा रंगत आहे. तिच्या अभिनयाचे आता कौतुक होत आहे. इतकेच नाही तर अदा तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. आता एका मुलाखतीत अदाने तिचं खरे नाव सांगितले आहे. ती म्हणाली, माझे खरे नाव चामंडेश्वरी अय्यर आहे. उच्चार करण्यासाठी नाव फार कठीण असल्यामुळे स्वतःचे नाव बदलून अदा शर्मा असे ठेवलं आहे. अदाच्या बॉलीवूड करिअरबद्दल सांगायचे झाले तर ती गेल्या 1 वर्षापासून मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे, पण ‘द केरला स्टोरी’ सिनेमामुळे अदाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला सिनेमा बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचा गल्ला ओलांडण्याची शक्यता आहे. आता येत्या दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Back to top button