बहिणीच्या साखरपुड्यात प्रियांकाचा रूबाब

प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्रा
Published on: 
Updated on: 

अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चढ्ढा यांचा साखरपुडा सोहळा झाला. साखरपुड्याला त्यांची जवळची मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते. अभिनेत्री प्रियांका चोप्राही बहिणीच्या साखरपुड्याला आवर्जून हजर होती. आता या साखरपुड्यात प्रियांकाने नेसलेल्या साडीची खूप चर्चा आहे. साखरपुड्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या साखरपुड्यासाठी प्रियांकाने खास साडी तयार करून घेतली होती.परिणिती आणि राघवच्या साखरपुड्यात प्रियांका चोप्राचा लूक लक्ष वेधून घेत होता. या साखरपुड्याला तिने पिवळ्या रंगाची रफल्ड साडी नेसली होती, तर ब्लाऊजच्या ऐवजी तिने ऑफ-शोल्डर कॉर्सेट-नुमा टॉप परिधान केला होता. तिने नेसलेल्या या साडीची किंमत आता समोर आली आहे. तिची साडी 'मिश्रू' ब्रँडची होती आणि या साडीची किंमत सुमारे 78 हजार 700 इतकी होती, असे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news