HBD Madhuri Dixit: माधुरीने २० वर्षांनी मोठ्या विनोद खन्नासोबत दिला होता किसिंग सीन | पुढारी

HBD Madhuri Dixit: माधुरीने २० वर्षांनी मोठ्या विनोद खन्नासोबत दिला होता किसिंग सीन

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऐंशी आणि ९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये किसिंग सीन करणं (HBD Madhuri Dixit) खूप मोठी बाब होती. कुठलीही अभिनेत्री हा सीन देण्यास तयार होत नसत. आज आपण माधुरी दीक्षित विषयी जोणून घेणार आहोत, जिने पडद्यावर २० वर्षांनी मोठ्या असलेल्या विनोद खन्ना यांच्यासोबत इंटिमेट सीन दिले होते. माधुरी आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. असे म्हटले जात की, माधुरीच्या सिनेजीवनातील विनोद खन्नासोबतचा तो सीन दिल्यानंतर तिला पश्चाताप करावा झाला होता. (HBD Madhuri Dixit )

१९८८ मध्ये दयावान हा चित्रपट रिलीज झाला होता. माधुरी दीक्षित-विनोद खन्ना यांच्यावर एक हॉट किसिंग सीन चित्रित करण्यात आला होता. ज्यामुळे तिची खूप चर्चा झाली होती. आज १५ मे रोजी माधुरी ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

बॉलीवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित प्रसिद्ध अभिनेत्री होती. अनेक चित्रपटांपैकी तिचा एक चित्रपट दय़ावान १९८८ मध्ये रिलीज झाला होता.

या चित्रपटात तिने अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबत हॉट किसिंग सीन दिले. या सीनची त्यावेळी खूप चर्चा झाली. पण, असं म्हटलं जातं की, माधुरीला या किसिंग सीननंतर खूप पश्चाताप करावा लागला होता.

माधुरी दीक्षित-विनोद खन्ना यांच्यात इंटिमेट सीन

विनोद खन्ना माधुरी पेक्षा वयाने २० वर्षांनी मोठे होते. ‘दयावान’ मध्ये विनोद खन्नासोबत इंटिमेट सीन दिल्यानंतर धुमाकूळ उडाला. मीडिया रिपोर्ट्समुसार, हा सीन पाहिल्यानंतर अनेक लोकांनी माधुरीवर टीका केली. जेव्हा स्वत: माधुरीने चित्रपट पाहिला तेव्हा असे समजले की, खरंच या सीनची चित्रपटात गरज नव्हती.

माधुरीने एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘मी नॉन फिल्मी बॅकग्राउंडमधून येते. यामुळे माहिती नव्हतं की, तेव्हा इंडस्ट्रीत कसं काम चालतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

Back to top button