फटाफटी : बंगाली सुपरस्टार रिताभरी चक्रवर्तीच्या चित्रपटाचे मुंबईत स्क्रीनिंग | पुढारी

फटाफटी : बंगाली सुपरस्टार रिताभरी चक्रवर्तीच्या चित्रपटाचे मुंबईत स्क्रीनिंग

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगाली सुपरस्टार रिताभरी चक्रवर्ती हिने मुंबईत तिच्या नवीन चित्रपटाचं ‘फटाफाटी’चे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केले होते. अनेक सिने तारकांनी या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. आपल्या मनमोहक अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या रिताभरी चक्रवर्तीने ‘फटाफाटी’मधील तिच्या अफलातून अभिनयाने या चित्रपटामध्ये वेगळीच जादू निर्माण केली आहे.

रिताभरी चक्रवर्ती म्हणते , “चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाने मी भारावून गेले आहे. अशा प्रकारचे विशेष स्क्रिनिंग आयोजित करणे आणि मला इंडस्ट्रीतील माझ्या मित्रांचा पाठिंबा मिळणे याहून मोठी गोष्ट काय असू शकते.”

हा चित्रपट १२ मे, २०२३ रोजी भारतात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Back to top button