Ustaad Bhagat Singh : दमदार पोलिसाच्या स्वॅगमध्ये पवन कल्याण, पहा पहिली झलक | पुढारी

Ustaad Bhagat Singh : दमदार पोलिसाच्या स्वॅगमध्ये पवन कल्याण, पहा पहिली झलक

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलुगू अभिनेता पवन कल्याणने त्याच्या चाहत्यांना खुशखबर देत बहप्रतीक्षित आगामी ‘उस्ताद भगत सिंह’ ( Ustaad Bhagat Singh ) या चित्रपटाची पहिली झलक दाखविली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हरीश शंकर यांनी केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटासाठी चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

फिल्म मेकर्सने त्याच्या टविटर अकाऊंटवर आगामी ‘उस्ताद भगत सिंह’ ( Ustaad Bhagat Singh ) चित्रपटाचा पहिला टिझर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता पवन कल्याण पुन्हा एकदा एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. निर्मात्यांनी शेअर केलेल्या सुमारे ४० सेंकदांची छोटीशी टिझरमध्ये सुपरस्टारचा पोलिसाच्या भूमिकेत स्वॅग पाहायला मिळाला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत कॉमेन्टचा पाऊस पाडलाय. दरम्यान एका युजर्सने ‘या अद्भूत टिझरसाठी धन्यवाद.’ दुसऱ्या युजर्सने ‘मी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होतो.’ असे लिहिले आहे. तर काही चाहत्यांनी फायर इमोजी शेअर केले आहेत.

उस्ताद भगत सिंग या चित्रपटाची निर्मिती Mythri Movie Makers ने केली आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले शेड्यूल शूट करण्यात आलं आहे. तर चित्रपटाचे दुसरे शेड्यूल या महिन्यात सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पवन कल्याणसोबत चित्रपटात श्रीलीला आणि पंकज त्रिपाठी यांनी भूमिका साकारल्या आहेत. देवी श्री. प्रसाद यांनी चित्रपटाला संगीतबद्ध केलं आहे.

हेही वाचा : 

Back to top button