Kennedy : सनी लिओनीच्या मर्डर मेलडी केनेडीचा टीझर रिलीज! (Video) | पुढारी

Kennedy : सनी लिओनीच्या मर्डर मेलडी केनेडीचा टीझर रिलीज! (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : सनी लिओनीचा आगामी केनेडी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. (Kennedy ) दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत तिचा हा पहिला प्रोजेक्ट आहे. सनी तिच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आऊट ऑफ द बॉक्स परफॉर्मन्स देण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि ‘केनेडी’ नावाची ही आगामी मर्डर मेलडी एका थ्रिलर पेक्षा कमी नाही. (Kennedy )

कान्स फिल्म फेस्टिवलच्या आधी सनीने तिच्या सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर रिलीज केला. हा टीझर शेअर करताना तिने लिहिलंय-“बतानो…कितना मजा आया…ये टीझर देख के?!

दरम्यान, २४ मे रोजी Festival De Cannes मध्ये अनुराग कश्यपच्या केनेडीचे प्रीमियर होणार आहे. हा टीझर काही क्षणात प्रेक्षकांची मन जिंकून घेतो. हा चित्रपट एकतर ओटीट किंवा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्याची सिनेरसिक वाट पाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

Back to top button