मेल पाठवायचायं, टेन्शन नको: आता Gmail लिहणार तुमचा ई-मेल, गुगलनं आणलेलं नवं फिचर वापरा असं …

मेल पाठवायचायं, टेन्शन नको: आता Gmail लिहणार तुमचा ई-मेल, गुगलनं आणलेलं नवं फिचर वापरा असं …
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: Gmail जगातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या ईमेल सेवेपैकी एक आहे. तुम्ही देखील ऑफिसच्या कामांसाठी जीमेल वापरत असालच. ऑफिसच काय तर आज काल शाळकरी विद्यार्थ्यांचे देखील जीमेल अकाउंट असते. एकूणच ऑफिस, शाळा, ऑनलाईन क्लासेसमध्ये जीमेल सेवेचा वापर सर्वाधिक होतो. त्याचे कारण देखील तसेच आहे. इंटरनेट कनेक्शनशिवाय मेल पाठवण्यासाठी एक्स्पायरी मोडपासून पासकोडपर्यंत पाठवलेले ईमेल स्मरण करण्यापर्यंत Google ने या प्लॅटफॉर्ममध्ये अनेक नवीन फीचर्सचा समावेश केला आहे. आता गुगल असेच एक नवीन फिचर जीमेलसाठी आणत आहे. हे नवीन फिचर तुम्हाला इमेल्स लिहण्यास मदत करणार आहे.

गुगलने बुधवार १० मे रोजी झालेल्या I/O 2023 डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये जीमेलसाठी एक नवीन फिचर जाहीर केले आहे, जे वापरकर्त्यांना पटकन आणि अधिक सहजपणे ईमेल लिहिण्यास मदत करेल. नवीन AI फिचर "हेल्प मी राईट ," हे वापरकर्त्याच्या इनपुटवर आधारित ईमेल ड्राफ्ट तयार करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करते. नवीन 'हेल्प मी राईट' फिचर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना फक्त ईमेल टाइप करणे सुरू करावे लागेल आणि नंतर "हेल्प मी राईट" बटणावर क्लिक करावे लागेल. AI नंतर आपोआप ईमेलचा मसुदा तयार करेल, जो वापरकर्ता गरजेनुसार बदलून पाठवू शकतो.

जीमेलसाठी नवीन AI टूलचे प्रात्यक्षिक दाखवताना गुगल सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितले की, नवीन 'हेल्प मी राईट' विविध ईमेल कामासाठी वापरला जाऊ शकतो, जसे की, क्विक थँक यू -नोट पाठवणे, मीटिंग शेड्यूल करणे किंवा फॉलोअप करणे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सामान्य परिस्थितींसाठी ईमेल टेम्पलेट्स देखील तयार करू शकते. उदाहरणार्थ नोकरीसाठी अर्ज करणे किंवा रिफंड मागणे.

'हेल्प मी राईट' हे फिचर मार्चमध्ये "ट्रस्टेड टेस्टर" यांच्यासाठी लाँच करण्यात आले होते आणि ते अद्याप विकसित होत आहे. हे फिचर हळूहळू वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल. एकदा का हे फिचर उपलब्ध झाल्यावर ते वापरकर्त्यांचा ईमेल लिहितानाचा बराच वेळ आणि मेहनत वाचवू शकते. हे फिचर भविष्यात आणखी उपयुक्त होण्याची शक्यता आहे.

जर तुम्हाला नवीन AI फिचर "हेल्प मी राईट" वापरून पहायचे असल्यास या आहेत गाईडलाईन्स-

  1. Gmail वर जा आणि तुमच्या खात्यात साइन इन करा.

2. नवीन ईमेल सुरू करण्यासाठी कंपोज बटणवर क्लिक करा.

3. तुमचा ईमेल टाइप करणे सुरू करा.

4. तुम्ही टाईप करताच, सेंड बटणच्या पुढे तुम्हाला एक लहान पेन्सिल चिन्ह दिसेल

5. "हेल्प मी राईट" मेनू उघडण्यासाठी पेन्सिल चिन्हावर क्लिक करा.

6. "हेल्प मी राईट" मेनू तुम्हाला तुमच्या ईमेलमध्ये मदत करण्यासाठी विविध पर्याय देईल. जसे की, शब्द आणि वाक्ये सुचवणे, वाक्य पूर्ण करणे, ईमेल टेम्पलेट्स तयार करणे, व्याकरण आणि शुद्ध लेखन.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news