Lavaste Teaser: बेवारस मृतदेहांवर आधारित चित्रपटाचा दमदार टीझर | पुढारी

Lavaste Teaser: बेवारस मृतदेहांवर आधारित चित्रपटाचा दमदार टीझर

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘लावास्ट’ (Lavaste Teaser) चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज झाला आहे. बेवारस मृतदेहांविषयी खूप गंभीर आणि अंगावर शहारे आणणारी कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आलीय. Lavaste Teaser टीजर रिलीज होताच सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. एडिव प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडने ‘लावास्ट’ चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे.

टीझरमध्ये दाखवली कहाणी

‘लावास्ट’ एक बी. टेक झालेल्या सत्यांशच्या आयुष्याच्या अवतीभोवती फिरणारी कहाणी आहे. त्याचे काम मृतदेह उचलमे आहे. ही कहाणी त्याची अथवा त्याच्या परिवाराची नाही तर, त्या बवारस मृतदेहांची आहे, ज्याचे कुणी वारस नाहीत. चित्रपटाचा उद्देश मृतदेहांसाठी लोकांना एकत्र करणे, जागृत करणे आहे.

बेवारस मृतदेहांची अकल्पित शोकांतिका

या चित्रपटाचा टीझर इतका वेगळा आहे की, लोक व्हिडिओ पाहून विचार करायला लागतील. दिग्दर्शक सुदेश कनौजिया, निर्माता आदित्य वर्मा आणि सहनिर्माते रोहनदीप सिंह आहेत.

ओमकार कपूर, मनोज जोशी, बृजेंद्र काला, उर्वशी एस शर्मा, शुभांगी लतकर, आदित्य वर्मा, विकास गिरी हे कलाकार असतील. ‘लावास्ट’ २६ मे ला रिलीज होईल.

Back to top button