ऑटोग्राफ : अंकुश-अमृता-उर्मिलाच्या अभिनयाने सजलेला चित्रपट | पुढारी

ऑटोग्राफ : अंकुश-अमृता-उर्मिलाच्या अभिनयाने सजलेला चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेमापेक्षा नातं महत्वाचं…कारण प्रेम एकवेळ संपेल पण नातं… ते कायमच असतं…. अशीच एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी म्हणजे ऑटोग्राफ सिनेमा. एका व्यक्तीच्या खऱ्या प्रेमाच्या शोधाची आणि त्याच्या या प्रवासात त्याला भेटलेल्या माणसांची ही कथा आहे. सतीश राजवाडे यांचं दिग्दर्शन, अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, उर्मिला कानेटकर, मानसी मोघे अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आलीय.

ऑटोग्राफ चित्रपट
ऑटोग्राफ चित्रपट

ऑटोग्राफ सिनेमाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले, ‘लव्हस्टोरी करायला एक वेगळीच मजा असते. प्रत्येक लव्हस्टोरी आपल्याला कुठेतरी आपलीच आहे असं भासवते आणि म्हणूनच ती प्रत्येकाच्या मनाला भिडते. ऑटोग्राफसुद्धा अशीच एक लव्हस्टोरी आहे . जगातला प्रत्येक माणूस या अशा प्रवासातून गेलाय. पण याचा शेवट मात्र अनुभवण्यासारखा आहे. दिग्दर्शक म्हणून मला तो फार आवडलाय आणि मला खात्री आहे रसिकांना सुद्धा तो नक्की आवडेल.’

हा चित्रपट थिएटर आणि ओटीटीच्या अगोदर स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळेल.

Back to top button