The Kerala Story चित्रपट वास्तव कथेवर आहे तर सरकारला तपास करायला हवा : आरिफ मोहम्मद खान | पुढारी

The Kerala Story चित्रपट वास्तव कथेवर आहे तर सरकारला तपास करायला हवा : आरिफ मोहम्मद खान

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट द केरळ स्टोरीवर ट्रेलर रिलीज झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. (The Kerala Story) चित्रपट ३२ हजार मुलींना इसिसमध्ये भरती करण्यावर आधारित आहे. दरम्यान, ‘द केरळ स्टोरी’वर सुरु असलेल्या वादादरम्यान केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचे वक्तव्यदेखील समोर आले आहे. या चित्रपटाबाबत विधान करत ते म्हणाले की, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे की, ते राज्यातील कोणत्याही प्रकारच्या लव्ह जिहादच्या घटनांविरोधात पाऊले उचलावीत. (The Kerala Story)

आरिफ मोहम्मद खान म्हणाले, मी चित्रपट पाहिलेला नाही. मी काहीही सांगण्याच्या स्थितीत नाही. जर ते म्हणत असतील की, हा चित्रपट वास्तव कहामींवर आधारीत आहे तर मग मला वाटतं की, या प्रकरणाचा तपास करणे सरकारचे कर्तव्य आहे.

ट्रेलर र‍िलीज झाल्यानंतर उद्भवला वाद

अदा शर्मा स्टारर सुदीप्तो सेन दिग्दर्शित चित्रपट ‘द केरल स्टोरी’ चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाची कहाणी केरळच्या ३२ हजार ह‍िंदू आणि ख्रिश्चन मुलींची आहे. ज्यांना तथाकथितपणे लव्ह जिहादमध्ये अडकवण्यात आले आहे.

Back to top button