Adipurush: प्रभासच्या चित्रपटाविषयी नवी अपडेट समोर, या तारखेला... | पुढारी

Adipurush: प्रभासच्या चित्रपटाविषयी नवी अपडेट समोर, या तारखेला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओम राऊत यांच्या बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक असलेल्या आदिपुरुष चित्रपटाचा ग्लोबली ट्रेलर लॉन्च (aadipurush) करण्यात येणार आहे. ९ मे, २०२३ रोजी वैश्विक ट्रेलर लॉन्चसोबत इतिहास रचायला प्रभासचा चित्रपट तयार आहे. चित्रपटाच्या टीमने मेगा लॉन्चची घोषणा करत नवे पोस्टर जारी केलं आहे. (aadipurush)

या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत आणि भूषण कुमार यांची निर्मिती आहे. हा चित्रपट ट्रिबेका फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय प्रीमियरसाठी निवडला गेला आहे. टीमने एक शानदार ट्रेलर लॉन्च केला आहे. वैश्विक स्तरावर हा चित्रपट दाखवला जाईल. केवळ भारतातचं नाही तर ७० देशांमध्ये लॉन्च केलं जाईल.

या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत आणि भूषण कुमार यांची निर्मिती आहे. हा चित्रपट ट्रिबेका फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय प्रीमियरसाठी निवडला गेला आहे. टीमने एक शानदार ट्रेलर लॉन्च केला आहे. वैश्विक स्तरावर हा चित्रपट दाखवला जाईल. केवळ भारतातचं नाही तर ७० देशांमध्ये लॉन्च केलं जाईल. भारत, संयुक्त राज्य अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, आशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, हाँगकाँग, फिलिपिन्स, म्यानमार, श्रीलंका, जपान, आफ्रिका, ब्रिटन, युरोप, रशिया, इजिप्तमध्ये लॉन्च होईल.

१६ जून, २०२३ रोजी हा चित्रपट ग्लोबली रिलीज होईल.

Back to top button