Priyanka Chopra : नाकाच्या सर्जरीमुळे चेहराच बदलला अन्‌ मी डिप्रेशनमध्ये गेले; प्रियांकाने सांगितली बदलेल्या नाकाची कहाणी | पुढारी

Priyanka Chopra : नाकाच्या सर्जरीमुळे चेहराच बदलला अन्‌ मी डिप्रेशनमध्ये गेले; प्रियांकाने सांगितली बदलेल्या नाकाची कहाणी

पुढारी ऑनलाईन डेस्क – हॉवर्ड स्टर्न शोमध्ये, प्रियांका चोप्राने आपल्या नाकाच्या (Priyanka Chopra) सर्जरीविषयी सांगितले. तिने सन २००० मध्ये मिस वर्ल्डचा ताज जिंकल्यानंतर सांगितले की, तिला श्वास घेण्यास त्रास का होत आहे हे तपासण्यासाठी ती डॉक्टरांकडे गेली होती. (lingering head cold) डॉक्टरांना पॉलीप (ऊतींची वाढ) आढळून आली होती आणि ती तिच्या नाकाच्या पोकळीतून काढून टाकण्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुचवली होती. (Priyanka Chopra)

प्रियांकाने दावा केला की, शस्त्रक्रियेदरम्यान, डॉक्टरांकडून चुक झाली आणि तिचा चेहरा बदलला. “तो खूप वाईट प्रसंग होता.”

तिने पुढे सांगितले की, या घटनेनंतर तिला तीन चित्रपटांमधून काढून टाकण्यात आले आणि तिच्या अभिनयाचे करिअर र्द “सुरू होण्याआधीच संपले होते. माझा चेहरा पूर्णपणे वेगला दिसत होता. मी खूप उदास होऊन डिप्रेशनमध्ये गेले. परिस्थिती इतकी वाईट होती की, घराबाहेर पडण्याचीही इच्छा नव्हती.

तेव्हा प्रियांकाचे वडील स्वत: एक डॉक्टर होते. त्यांनी पुन्हा सर्जरी करून नाक ठिकठाक करण्याचा सल्ला दिला. तेव्हा प्रियांका खूप घाबरली होती. वडील तिच्यासोबत खोलीत असतील, असे तिला सांगितले. वडिलांनी मला आत्मविश्वास परत आणण्यास मदत केली.

 

Back to top button