Athiran : मल्याळम भाषेतील ‘थरार प्रेमाचा-अथिरन’ मराठीत पाहता येणार | पुढारी

Athiran : मल्याळम भाषेतील ‘थरार प्रेमाचा-अथिरन’ मराठीत पाहता येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओटीटीवर ‘थरार प्रेमाचा- अथिरन’ पाहता येणार आहे. (Athiran ) ८ मेपासून या अल्ट्रा झकासवर या चित्रपटाचा थरार रंगणार आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत बहुचर्चित ठरलेल्या ‘अथिरन’ या मल्याळम भाषेतील चित्रपट मराठीत डब करण्यात आला आहे. (Athiran )

पुष्पा फेम अभिनेता फहाद फासिल, अभिनेत्री साई पल्लवी, अभिनेता अतुल कुलकर्णी आणि प्रकाश राज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. चित्रपटाचे दाक्षिणात्य दिग्दर्शक विवेक यांनी दिग्दर्शन केलं आहे. भूतकाळातल्या घटनांमध्ये अडकलेल्या आणि उपचारासाठी एका रुग्णालयात डांबून ठेवलेल्या नित्याच्या सुटकेचा मनोरंजक थरार प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Back to top button