मराठी युवा दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांचे निधन, चित्रपट रिलीज होण्याच्या एक दिवस आधी काळाचा घाला

मुंबई : पुढारी वृत्तसेवा – मराठी पाऊल पडते पुढे उद्या प्रदर्शित होणार्या चित्रपटाचे लेखक- दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांचे निधन झाले. आज पहाटे चेंबूर घाटलागाव येथे राहत्या घरी त्यांचे निधन झाले. गेले काही महिने ते आजारी होते. हा त्याचा स्वतंत्र लेखक दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा होता.
या चित्रपटाचा शंभर टक्के निव्वळ नफा संपूर्णपणे खालील कारणांसाठी वितरीत केला जाणार आहे. निव्वळ नफा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मार्गदर्शन आणि मदत, वृद्धाश्रमांना मदत करण्यासाठी आणि दहा टक्के चित्रपट कलाकारांना दिला जाणार आहे. हा चित्रपट उद्या ५ मे रोजी प्रदर्शित होत असताना आज चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांचे निधन झाले, अशी माहिती चित्रपट निर्माते प्रकाश बाविस्कर यांनी दिली. या घटनेची माहिती कळताच आम्ही मयेकर यांच्या निवासस्थानी रवाना झालो आहोत असेही ते म्हणाले.