Gautami Patil Viral Video | गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आणखी एका युवकास अटक | पुढारी

Gautami Patil Viral Video | गौतमी पाटीलचा 'तो' व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आणखी एका युवकास अटक

सातारा, पुढारी वृत्तसेवा : लावणी क्वीन म्हणून ओळख असलेल्या गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल (Gautami Patil Viral Video) झाल्याची घटना काही महिन्यापूर्वी घडली होती. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर त्या आरोपींना अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलाने व त्याच्या साथीदारानेच तिचा तो व्हिडीओ व्हायरल केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी साताऱ्यातील एका अल्पवयीन मुलांसह दोघांना अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विमानतळ पोलिसांनी गौतमीच्या त्या व्हिडिओ संदर्भात अल्पवयीन मुलांसह दोघांना ताब्‍यात घेतले आहे. पोलिसांनी संबंधित मुलांकडे चौकशी केली असता त्यांनी तिच्याच नावाने बनावट खाते काढून ताे व्हिडीओ व्हायरल केल्याचे पोलिसांनी दिसून आले. याप्रकरणी आयुष अमृत कणसे (वय २१, रा. भरतगाव वाडी, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, एका १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणात विमातनळ पोलीस ठाण्यात विनयभंग व आयटी अॅक्टचा गुन्हा नोंद होता. गौतमी पाटीलच्या सहकारी तरुणीने याबाबत तक्रार दिली होती. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या गौतमीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. तर, अनेकांकडून या घटनेचा निषेध देखील केला गेला होता. तपासाअंती पोलीस अहमदनगर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्‍यांची चौकशी केली असता सातारा जिल्ह्यातील भरतगाव वाडी येथून आयुष कणसे याला ताब्‍यात घेण्यात अरले. त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. दरम्यान, तपासात हा व्हिडीओ यवत परिसरातील एका कार्यक्रमदरम्यान काढल्याचा संशय आहे, असे पोलीसांनी माहिती दिली. तसेच या प्रकणाचा पुढील पोलीस तपास करत आहेत. (Gautami Patil Viral Video)

-हेही वाचा 

नगर जिल्ह्यात अवकाळीचे दोन महिन्यांत दहा बळी ; मिळणार प्रत्येकी चार लाखांची मदत

विटा-महाबळेश्वर महामार्गावर भीषण अपघातात ४ जण ठार

रस्त्यांच्या 17 कोटींच्या कामांना लवकरच प्रारंभ ; आ. आशुतोष काळे यांची माहिती

Back to top button