तरूणांच्या स्वप्नांना बळ देणारा चित्रपट ‘मराठी पाऊल पडते पुढे’

मराठी पाऊल पडते पुढे सिनेमा
मराठी पाऊल पडते पुढे सिनेमा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 83 या बॉलीवूडपटात झळकलेला अभिनेता चिराग पाटील आणि गोव्याच्या किनाऱ्यावर गीताद्वारे रुपेरी वाळू सोनेरी लाटांवर स्वार झालेली अभिनेत्री सिद्धी पाटणे यांचा नवा चित्रपट येतोय. या लव्हस्टोरीने सजलेला 'मराठी पाऊल पडते पुढे!' हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने चिराग आणि सिद्धी हे प्रथमच एकत्र आले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीला हवा असलेला आणि या सिनेमाच्या कथानकाला साजेसा असा उंच शरिरयष्टी आणि देखणा नायक चिरागच्या रुपाने मिळाला आहे. म्युझिक अल्बमच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली सौंदर्यवती सिद्धी पाटणेची रोमँटीक साथ चिरागला लाभली आहे. रीअल लाईफमध्ये स्टाईल आयकॉन असणाऱ्या या दोन्ही कलाकारांची मराठी पाऊल पडते पुढे या सिनेमातील केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

मराठी माणूस हा केवळ नोकरीत रमणारा नाही तर व्यवसायात उतरून नोकरी देणारा होऊ शकतो असे वातावरण हा चित्रपट निर्माण करेल, अशी ग्वाही निर्माता प्रकाश बाविस्कर यांनी दिली.

चित्रपटाच्या संदर्भात कोल्हापूर येथे पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेस निर्माते प्रकाश बाविस्कर, चित्रपटाचा मुख्यअभिनेता चिराग पाटील व मुख्य अभिनेत्री सिद्धी पाटणे हे उपस्थित होते. लेखक-दिग्दर्शक म्हणून स्वप्निल मयेकर यांनी काम पाहिले आहे. या चित्रपटाचे म्युझिक ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

अकात फिल्म्सचे चंद्रकांत विसपुते हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संगीत दिग्दर्शक समीर खोले यांनी सिनेमाची सर्व गाणी संगीतबद्ध केली आहेत. स्वप्नील मयेकर लिखित-दिग्दर्शित तसेच चिराग पाटील, सिद्धी पाटणे, ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, सतीश सलागरे, संजय क्षेमकल्याणी आणि प्रदीप कोथमिरे यांच्या प्रमुख भूमिका चित्रपटात आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news