भोंडला : मराठी अभिनेत्रींनी साजरा केला पारंपरिक भोंडला | पुढारी

भोंडला : मराठी अभिनेत्रींनी साजरा केला पारंपरिक भोंडला

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री व इतर क्षेत्रातील सख्यांनी मिळून पारंपरिक भोंडला साजरा केला. अभिनेत्री अर्चना नेवरेकर व लीना नांदगावकर यांनी मिळून या भोंडला कार्यक्रमाचे आयोजन केले. कोरोना काळात भेटीगाठी थांबल्या होत्या. पण आता हळूहळू परिस्थती पूर्वपदावर येत आहे.

नवरात्रीचे औचित्य साधत या सख्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला . या कार्यक्रमाला अर्चना नेवरेकर, लीना नांदगावकर, सुप्रिया पाठारे, शिल्पा नवलकर, नियती राजवाडे, अदिती सारंगधर, वनश्री पांडे, मानसी नाईक, मेघा धाडे , पल्लवी प्रधान ,सुलेखा तळवलकर उपस्थित होत्या. रोहिणी निनावे, कांचन अधिकारी, नितु जोशी, डॉ. पूर्णिमा म्हात्रे, रेखा सहाय, वनिता कुंभारे, सोनल खानोलकर उपस्थित होते.

या निमित्ताने नुकतेच लग्न झालेल्या अभिनेत्री मानसी नाईक-खरेराचे गोड कौतुक करण्यात आले. यावेळी तिची ओटी भरण्यात आली.

Back to top button