kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : सलमानच्या चित्रपटाची छप्परफाड कमाई | पुढारी

kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : सलमानच्या चित्रपटाची छप्परफाड कमाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री पूजा हेगडेचा ईदच्या मुहूर्तावर ‘किसी का भाई किसी की जान’ ( kisi Ka Bhai Kisi Ki Jaan ) चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी अॅडव्हास बुकिंगची हळूवारपणे सुरूवात झाली. मात्र, ईद आणि रविवारची जोडून सुट्यांमुळे ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी थिएटरमध्ये तुफान गर्दी केली. यामुळे सलमानच्या चित्रपटाच्या छप्परफाड कमाईचे आकडे समोर आले आहेत. चित्रपट पुढील काळात धमाकेदार कामगिरी करेल अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.

चित्रपट समीक्षक तरण आर्दश यांनी सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ ( kisi Ka Bhai Kisi Ki Jaan ) चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आणले आहेत. ईद आणि विकेंड म्हणजे, शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा उपयोग चाहत्यांनी सलमानच्या चित्रपट पाहण्यासाठी केला आहे. यामुळे ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाने भरघोस कमाई केल्याचे चित्र समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर शुक्रवारी १५.८१ कोटी, शनिवारी २५.७५ कोटी, रविवारी २६.६१ कोटींचा कमाई केली आहे. तर एकूण या चित्रपटाने देशात ६८. १७ कोटींचा टप्पा पार केला आहे. याशिवाय अजून सलमानचा चित्रपट भरघोस कामगिरी करेल,  अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सलमानच्या या चित्रपटाचे काही चाहत्यांनी भरभरून कौतुक होत आहे. तर दुसरीकडे चित्रपटातील काही सीन नेटकऱ्यांना अजिबात आवडलेले नाहीत म्हणून ट्रोल केले आहे. यावरून चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात सलमानसोबत व्यंकटेश, पूजा हेगडे, जस्सी गिल, राघव जुयाल, जगपती बाबू, शहनाज गिल आणि पलक तिवारी हे कलाकार दिसले आहेत.

हेही वाचा 

Back to top button