Salman Khan Unmarried : ‘किसी का भाई किसी की जान’ म्हणणारा सलमान अद्याप का आहे एकटा? उघड केले ‘ड्रीम गर्ल’चे नाव! | पुढारी

Salman Khan Unmarried : ‘किसी का भाई किसी की जान’ म्हणणारा सलमान अद्याप का आहे एकटा? उघड केले ‘ड्रीम गर्ल’चे नाव!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान ५७ वर्षांचा आहे. गेली तीन दशके आमीर खान आणि शाहरुख खान प्रमाणे त्याने सिनेसृष्टीतील आणि प्रेक्षकांवरील आपला दबदबा कायम ठेवला आहे. बॉलिवूडमध्ये १०० कोटीहून अधिक गल्ला कमविणारे सर्वाधिक सिनेमे हे केवळ सलमान खानचे आहेत. या वरुनच त्याच्या स्टारडमची कल्पना येते. चॉकलेट बॉय म्हणून करिअरची सुरुवात करणारा सलमान कधी ॲक्शन हिरो झाला हे कळलेच नाही. मनोरंजनाची आणि फॅमिली ड्रामाची शंभर टक्के हमी तो आपल्या चित्रपटातून देत असतो. सध्या पुन्हा एकदा तो ‘किसी का भाई किसी की जान’ या नव्या कोऱ्या चित्रपटातून आपल्या प्रेक्षकांसाठी फॅमिली ड्रामा विथ ॲक्शन असा त्याचा फॉर्म्युला ‘ईद’ च्या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. (Salman Khan Unmarried)

या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सलमान लवर बॉय आशिक, कुटुंबवत्सल भाई आणि विलनसाठी ॲक्शनने भरलेला टायगर आणि चुलबुल पांडेची दभंगगिरी घेऊन येत आहे. अर्थातच त्याचे पॅन इंडिया चाहते सुद्धा या चित्रपटाला घेऊन उत्सुक आहेत. नुकतेच त्याने पठाणमध्ये शाहरुख खान सोबत एक कॅमिओ रोल केला. यात दोघांच्या ॲक्शनचा नजराना पहायला मिळाला आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांना करण-अर्जुन यांची आठवण झाली. मग काय करण – अर्जुनच्या मिमचा पाऊस सर्वांनी इंटरनेट आणि सोशल मीडियामध्ये अनुभवला. याचीच दखल घेत ‘टायगर वर्सेस पठाण’ या चित्रपटाची घोषणा झाली आहे. त्यामुळे शाहरुख खान विरुद्ध सलमान खान असा एक सामना आपल्याला लवकरच मोठ्या पडद्यावर अनुभवास मिळणार आहे. (Salman Khan Unmarried)

गेल्या ३० – ३५ वर्षांच्या कारकिर्दीत सलमान खानने अनेक हिट सिनेमे दिले. या हिट सिनेमांप्रमाणे त्याच्या आयुष्यात अनेक अभिनेत्री आल्या. तसेच त्या पुढे जाऊन त्याच्या प्रेमिका सुद्धा झाल्या. पण, गड्याचे एकी सोबत सुद्धा नीट जमले नाही. त्या-त्या काळात त्याच्या अफेअर्स आणि लग्नाची कायम चर्चा असायची. आता सुद्धा तो जेव्हा ५७ व्या वर्षांत आहे तरी सुद्धा त्याच्या लग्नाची चर्चा केली जाते. अजून सुद्धा या वयात तो ‘मोस्ट हॅन्डसम बॅचलर’ समजला जातो. तो ५७ वर्षांच्या असला तरी त्याच्या मुलीच्या आणि नातीच्या वयाच्या मुली आज सुद्धा त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात. आज ही अनेक जणी त्याच्याबरोबर लग्न करण्यास तयार आहेत. पण, हा पठ्ठया तयार असायला हवा ना? (Salman Khan Unmarried)

जेव्हा जेव्हा त्याचे फॅन आणि पत्रकार त्याच्या समोर त्याच्या लग्नाचा विषय काढतात तेव्हा तो काहीतरी उलटे-सुलटे उत्तर देऊन प्रश्न टाळत असतो किंवा काहीतरी अतंरगी बोलून पुढच्याची बोलती बंद करतो. पण, ‘किसी का भाई किसी की जान’ च्या निमित्ताने या प्रश्नाचे उत्तर त्याने थेट पणे दिले आहे. आज पर्यंत कुणासाठी तो एकटा राहिला ‘त्या’ नावाचा त्याने खुलासा केला आहे.

सलमानकडून ‘ड्रीम गर्ल’चा खुलासा

सलमानने अखेर ते नाव घेतले. सलमान खान आतापर्यंत पूजा साठी एकटा राहिला आहे. ही पूजा दुसरी तिसरी कोणी नसून ‘ड्रीम गर्ल २’ मधील अभिनेता आयुष्मान खुराना आहे. हे ऐकूण तुम्ही दचकला असाल पण या उत्तराने सलमान खानने साऱ्यांनाच अवाक केले आणि दचकवले आहे.

रुको जरा, सबर करो…

खरे तर सलमान खान आणि अभिनेता आयुष्यमान खुरानाचा हा प्रमोशनल ड्रामा आहे. अभिनेता आयुष्यमान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या निमित्ताने या दोन्ही अभिनेत्यांनी आपापल्या सिनेमांचे प्रमोशन करण्याचा नवा फंडा शोधला आहे.

समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये सलमान खान आयुष्मान खुरानासोबत अतिशय रोमँटिक अंदाजात बोलताना दिसत आहे. मात्र, ‘औरतोंने मुझे हमेशा अधेरे में ही रखा हैं, इसलिए मैं कुवाँरा ही बेटर हूं’ असं सलमान खान शेवटी म्हणतो आणि तेव्हा गंमत आणखी वाढते.

सलमान खानचा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ २१ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. तर आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’ ७ जुलैला रिलीज होणार आहे. या व्हिडिओमध्ये आयुष्मान खुरानाने भाईजानला वचन दिले आहे की तो ईदच्या दिवशी ‘ड्रीम गर्ल २’ मधून त्याचा लूक रिलीज करेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)


अधिक वाचा :

Back to top button