SpaceX Starship Mission Failed : एलॉन मस्क यांच्या स्वप्नांचा चुराडा; स्पेसएक्स स्टारशीप रॉकेटचा स्फोट | पुढारी

SpaceX Starship Mission Failed : एलॉन मस्क यांच्या स्वप्नांचा चुराडा; स्पेसएक्स स्टारशीप रॉकेटचा स्फोट

टेक्सास; पुढारी ऑनलाईन : जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या एलोन मस्क यांचा महत्त्वाकांक्षी आणि एैतिहासिक प्रोजेक्ट असणाऱ्या स्टारशिपचा उड्डाण दरम्यान स्फोट झाला. एलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्सच्या महाकाय रॉकेट स्टारशिपचा पहिल्या उड्डाणादरम्यान स्फोट झाला. (SpaceX Starship Mission Failed)

चंद्र, मंगळ आणि त्यापलीकडे अंतराळवीरांना पाठवण्यासाठी डिझाइन केलेले स्टारशिप हे आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली रॉकेट असल्याचे मानले जात होते. स्पेसएक्स कंपनीच्या या महाकाय रॉकेटचा गुरुवारी पहिल्या चाचणीदरम्यान स्फोट झाला. (SpaceX Starship Mission Failed)

टेक्सासमधील बोका चिका येथील खाजगी स्पेसएक्स स्पेसपोर्ट स्टारबेसवरून पहाटे महाकाय रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. स्टारशिप कॅप्सूल, कोणत्याही क्रू सदस्यांशिवाय, तीन मिनिटांनंतर वेगळे होणार होते, परंतु ते वेळापत्रकानुसार वेगळे होऊ शकले नाही आणि रॉकेट त्याच्या उड्डाणाच्या चौथ्या मिनिटाला स्फोट झाला. रॉकेटने पृथ्वीपासून ३३ किलोमीटरचे अंतर कापले होते.

जगातील सर्वात मोठे रॉकेट

हे जगातील सर्वात मोठे रॉकेट असल्याचे सांगितले जात होते. हे रॉकेट दोन भागात विभागले गेले आहे. वरच्या भागाला स्टारशिप म्हणतात. त्याची उंची ३९४ फूट तर व्यास २९.५ फूट आहे. या रॉकेटच्या माध्यमातून अंतराळवीर मंगळावर यशस्वीपणे पोहोचू शकतील, असे सांगण्यात येत आहे. रॉकेटमध्ये १२०० टन इंधन ठेवण्याची क्षमता आहे. या रॉकेटची क्षमता इतकी आहे की ते अवघ्या एका तासात संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालू शकते.

या शीपचा दुसरा भाग खूपच जड आहे. हे 226 फूट उंच रॉकेट आहे. जे पुन्हा वापरण्यायोग्य आहे. म्हणजेच, ते स्टारशिपला उंचीवर नेईल आणि परत येईल. यामध्ये ३४०० टन इंधन क्षमता आहे. हे 33 रॅप्टर इंजिनद्वारे उर्जा देण्याचे काम करते. हे रॉकेट स्टारशीप अंतराळात सोडून पुन्हा वातावरणात परतल्यानंतर समुद्रात कोसळणार होते.

अधिक वाचा :

Back to top button