परिणिती चोप्रा – राघव चड्ढा यांनी गुपचुप आटपला साखरपुडा? चार महिन्यांनी लग्न?(Parineeti Chopra and Raghav Chadha’s roka done)
मुंबई; पुढारी ऑनलाईन : लग्नसराई सुरु झाली असून पुन्हा एकदा मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि 'आप'चे नेते आणि खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे एकमेकांना डेट करतात हे आता सर्वश्रुत आहे. दोघांना एकमेकांसोबत अनेकदा सार्वजनिक ठिकाणी पाहिले गेले आहे. त्यामुळेच ते एकमेकांना डेट करतात हा दावा माध्यमांमधून केला जात आहे. परंतु अद्याप या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी दुसरीकडे माध्यमातून या दोघांनी 'रोका' (साखरपुडा) केल्याच्या बातम्या येत आहेत. (Parineeti Chopra and Raghav Chadha's roka done)
केव्हा होणार लग्न (Parineeti Chopra and Raghav Chadha's roka done)
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार खासदार राघव चढ्ढा आणि परिणीतीने अत्यंत खासगी पद्धतीने 'रोका' केल्याचा दावा केला जात आहे. हा सोहळा अत्यंत गुप्तपणे आणि कुटुंबातील काही सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला. सध्या दोघेही आपापल्या कामात व्यस्त असल्याचेही सूत्राने सांगितले. त्यामुळे दोघांनी ऑक्टोबर महिन्यापर्यंत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रियांका चोप्रा लग्नात होणार सहभागी
विशेष म्हणजे परिणितीची चुलत बहीण प्रियांका चोप्रा ऑक्टोबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. वास्तविक, यावर्षी २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत Jio MAMI फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात येणार आहे आणि प्रियांका चोप्रा या फिल्म फेस्टिव्हलची चेअरपर्सन आहे. अशा परिस्थितीत प्रियांका चोप्रा तिची बहीण परिणीतीच्या लग्नाला हजेरी लावू शकते, असे बोलले जात आहे. मात्र, आतापर्यंत या वृत्तांवर परिणिती चोप्रा किंवा राघव चढ्ढा यांचे कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
अधिक वाचा :
- नागपूर विद्यापीठ : १२० दिवस उलटूनही हिवाळी परीक्षांचे निकाल नाहीत; ओबीसी विद्यार्थी महासंघाचे तीव्र आंदोलन
- SpaceX Starship Mission Failed : एलॉन मस्क यांच्या स्वप्नांचा चुराडा; स्पेसएक्स स्टारशीप रॉकेटचा स्फोट
- गुरु-शिष्य एकत्र येण्याला आगामी विधानसभा, लोकसभेची झालर; खासदार सुजय विखेंना रोखण्यासाठी लंके -औटी एकत्र

