'स्वाभिमान' : रंगणार क्रिकेटचा सामना, पल्लवी करणार फलंदाजी - पुढारी

'स्वाभिमान' : रंगणार क्रिकेटचा सामना, पल्लवी करणार फलंदाजी

पुढारी ऑनलाईन :

स्टार प्रवाहवरील ‘स्वाभिमान’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. कॉलेज जीवनावर भाष्य करणाऱ्या या मालिकेत सध्या वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. लवकरच मालिकेत क्रिकेटचा सामनाही पाहायला मिळणार आहे. पल्लवी विरुद्ध ज्योती अशी टीम असल्यामुळे सामना रंगतदार होणार यात शंका नाही. हा सामना कोण जिंकणार, याची उत्सुकता आहेच. मात्र पल्लवीने या सामन्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. त्यामुळे पल्लवीसाठी हा सामना नसून हे युद्ध असणार आहे. ‘स्वाभिमान’ मालिकेत हा उत्कंठावर्धक सामना पाहायला मिळणार आहे.

या सीनसाठी टीमने खूपच मेहनत घेतली आहे. भर उन्हात हा सीन शूट करण्यात आल्यामुळे बरीच आव्हानं होती. मात्र कलाकारांनी खूप उत्साहाने हा क्रिकेटचा सीन शूट केला. पल्लवीची भूमिका साकारणाऱ्या पूजा बिरारीच्या हाताला दुखापत झालेली असतानाही तिने हे सीन साकारला.

शंतनू जरी पंचाच्या भूमिकेत असला तरी त्याने पल्लवीला बॅट कशी पकडायची इथपासून सामना जिंकण्यासाठी काय करावं लागेल, अशा सर्व टीप्स दिल्या. शंतनू आणि पल्लवीची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते आहे. या सामन्याच्या निमित्ताने या दोघांमधलं नातं आणखी खुलणार आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका स्वाभिमान सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

हेही वाचलं का ?

 

View this post on Instagram

 

A post shared by AKSHAR KOTHARI (@i_acheko)

Back to top button