बिग बॉस मराठीच्या घरामधून अक्षय वाघमारे बाहेर

akshay waghmare
akshay waghmare

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन ३ हे पर्व बरेच चर्चेमध्ये आहे. अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धक त्यांच्या भांडणाने, वाद – विवादाने घर गाजवत आहेत. इथं अवघ्या बारा तेरा दिवसामध्ये ग्रुप्स देखील तयार झाले आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली आहे. या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची, अक्षय वाघमारे, संतोष चौधरी (दादुस), विशाल निकम, तृप्ती देसाई आणि स्नेहा वाघ हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते.आता अक्षय वाघमारे घराबाहेर गेला आहे.

वरील सदस्यांपैकी कोणाला घरा बाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. शेवटी सुरेखा कुडची आणि अक्षय वाघमारे हे डेंजर झोन मध्ये होते. महेश मांजरेकर यांनी घोषित केले की, या आठवड्यामध्ये अक्षयला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. घरातील प्रत्येक सदस्याला अश्रू अनावर झाले.

तेव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल? कोण घराचा नवा कॅप्टन बनेल? सदस्यांना कोणते टास्क मिळणार हे बघणे रंजक असणार आहे.

महेश मांजरेकर यांनी घरातून बाहेर आल्यावर अक्षयने घरामधल्या अनुभवाबद्दल विचारले. तेंव्हा तो म्हणाला, मी सर्वात जास्त जय, विशाल आणि उत्कर्षला मिस कारेन. त्यानंतर विकास आणि तृप्तीताईंची आठवण येई. त्या घरामध्ये राहणं खूप कठीण आहे. मी टास्क खेळलो तेव्हा पूर्ण जीव ओतून खेळलो.

घरामधून बाहेर पडणारा पहिला सदस्य अक्षय ठरलाय. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल? आणि कोण घराबाहेर जाईल? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.

हेदेखील वाचा-

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news