असं काय झालं की, अमिताभ-रेखा यांनी पुन्हा एकत्र काम केलं नाही! | पुढारी

असं काय झालं की, अमिताभ-रेखा यांनी पुन्हा एकत्र काम केलं नाही!

पुढारी ऑनलाईन

सत्तरच्‍या दशकात सिनेमांसोबतच अमिताभ-रेखा यांच्‍या जवळीकीबद्‍दल खूप चर्चा झाली. यामुळे अमिताभजींच्‍या वैयक्‍तिक आयुष्‍यात वादळ आल्‍याचेही सांगितले गेले. अभिनेत्री परवीन बाबीसोबतच्‍या अमिताभ बच्चन यांची मैत्रीची चर्चा अशीच रंगली होती. कालांतराने सगळे काही स्‍थिरसावर झाले तरी आजही अमिताभ-रेखा एखाद्‍या कार्यक्रमात एकत्र किंवा समोरासमोर आले तर चर्चा होतात. जया बच्‍चनच्‍या चेहर्‍यावरील भाव टिपले जातात. रेखाही बच्‍चन या विषयावर बोलण्‍याची संधी सोडत नाहीत.

या दोघांची जोडी सर्वांत अधिक चर्चिली गेली. दोघांनी यश चोप्रा यांचा रोमँटिक ड्रामा चित्रपट ‘सिलसिला’ या चित्रपटांत एकत्र काम केले होते. हा त्‍यांचा शेवटचा चित्रपट ठरला. दोघांनी ‘दो अनजाने’मध्‍ये पहिल्‍यांदा एकत्र काम केलं होतं. बिग बींची यांची साथ मिळताच रेखाचं चित्रपट करिअर बहरलं.

rekha and amitabh

निर्माते जी. एम. रोशन यांनी ‘दुनिया का मेला’ या आपल्‍या चित्रपटामध्‍ये या दोघांना घेतलं होतं. तेव्‍हा अमिताभ यांची लोकप्रियता फारशी नव्हती. म्हणून आयत्‍या वेळेला त्‍यांच्‍याऐवजी संजय खान यांना घेण्‍यात आलं. नंतर रेखा याचं नाव संजय खानशी जोडलं गेलं. हळूहळू अमिताभ यांची लोकप्रियता वाढू लागली. त्‍यावेळी दिग्‍दर्शक दुलाल गुहांचा ‘दुश्‍मन’ (राजेश खन्‍ना-मुमताज) गाजला होता.
ते ‘दोस्‍त’ व ‘प्रतिज्ञा’ चित्रपट बनवत होते. त्‍याचवेळी ‘दो अंजाने’ या त्‍यांच्‍या नव्‍या चित्रपटात नायिकेची भूमिका खलनायकाच्‍या ढंगाची होती.

१९२० मध्‍ये पश्‍चिम बंगालमध्‍ये एक घटना घडली. राज्‍याच्‍या राजकुमारास पत्‍नीने विष देऊन मारलं. फॅमिली डॉक्‍टर हा तिचा प्रियकर होता. परंतु, मृत्‍यूनंतर राजकुमार संन्‍याशाच्‍या रुपात येऊन आपला हक्‍क मागतो. लेखक निरंजन गुप्‍ता यांनी या घटनेच्‍या आधारे कथा लिहिली. परंतु, ही भूमिका करण्यास मुमताज आणि शर्मिलाने नकार दिल्‍यावर, ती भूमिका रेखा यांच्‍या वाट्‍याला आली. या चित्रपटाने रेखाची प्रतिमा बदलली.

‘सावन भादो’च्‍यावेळी अवघी सोळा वर्षांची असलेली काळीसावळी रेखा नंतर खूप सुंदर दिसू लागली.

सेटवर झाली पहिली भेट

अमिताभ-रेखा यांची भेट पहिल्‍यांदा ‘दो अंजाने’च्‍या सेटवर झाली होती. अमिताभ सुपरस्टार बनले होते आणि जया यांच्‍याशी विवाहदेखील झाला होता. परंतु, रेखा यांना खास अशी ओळख मिळाली नव्‍हती. ज्‍यावेळी ‘गंगा की सौगंध’ चित्रपटाच्‍या शूटिंगदरम्‍यान एका सहाय्‍यक अभिनेत्‍याने रेखाला अपमानास्‍पद वागणूक दिली होती. त्‍यावेळी अमिताभ संतापले होते. या प्रसंगावरून त्‍यांचं प्रेम उघडकीस आलं होतं.

रेखाच्‍या आयुष्‍यावरील ‘रेखा : द अनटोल्ड स्टोरी’ या नव्‍या पुस्‍तकात अमिताभसोबतच्‍या नात्‍याबद्‍दल लिहिण्‍यात आलयं. यासिर उस्मान हे या पुस्‍तकाचे लेखक होते. पुस्‍तकात अनेक खुलासे करण्‍यात आले आहेत.

हिंदी सिनेजगतात अनेक खासगी आयुष्‍यातील प्रेमकथा या मोठ्‍या पडद्‍यावर दाखवल्‍या जातात. असचं काहीतरी या दोघांच्‍याबद्‍दल झालं.

rekha

त्यांच्‍या प्रेमकहाणीशी साधर्म्य असलेली कथा ‘सिलसिला’मध्‍ये दाखवल्‍याची चर्चाही त्‍यावेळी होती. दोघांनी एकत्र अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्‍यात ‘सुहाग,’ ‘मि. नटवरलाल,’ ‘गंगा की सौगंध,’ ‘नमक हराम,’ ‘खून पसीना,’ ‘राम- बलराम’ आणि ‘सिलसिला’ अशा सिनेमांचा समावेश आहे.

प्रसिध्‍द चित्रपट दिग्‍दर्शक प्रकाश मेहरा यांचा चित्रपट ‘मुकद्दर का सिकंदर’मध्‍ये या जोडीने पहिल्‍यांदा यशाची उंची गाठली. नंतर दोघांनीही एकापेक्षा एक चित्रपट देऊन हिंदी चित्रपटसृष्‍टीत आपलं नाव कमावलं.

…दोघांना पाहून जया यांच्‍या डोळ्‍यांतून अश्रू वाहिले

‘रेखा : द अनटोल्ड स्टोरी’ पुस्‍तकात दिलेल्‍या माहितीनुसार, जया यांच्‍यामुळे बच्चन यांनी रेखासोबत कधीही काम न करण्‍याचा निर्णय घेतला होता.

त्‍यात रेखाने म्‍हटलयं की, ‘एकदा मुकद्दर का सिकंदर चित्रपटाच्‍या ट्रायलवेळी मी प्रोजेक्शन रूममधून संपूर्ण बच्चन फॅमिलीला पाहत होते. जया समोरच्‍या सीटवर बसल्‍या होत्‍या. त्‍यांचे आई-वडील मागे बसले होते. या चित्रपटात मी अमिताभसोबत एक लव्‍ह सीन शूट करत होते. त्‍यावेळी मी जया यांच्‍या डोळ्‍यांतून अश्रू येताना पाहिलं. त्‍यानंतर एका आठवड्‍याने मला इंडस्ट्रीत लोक म्‍हणून लागले की, त्‍याने (अमिताभ) आपल्‍या निर्मात्‍याला सांगितलं आहे की, तो आता माझ्‍यासोबत काम करणार नाही.

रेखाच्‍या मंगळसुत्राने खळबळ

अमिताभ-रेखा यांच्‍या अफेअरचे वृत्त जया बच्चन यांच्‍यापर्यंत पोहोचले होते. त्‍या चिंतेत राहू लागल्‍या. दरम्‍यान, जया यांना ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांच्‍या लग्‍नाचं आमंत्रण आलं. ऋषी कपूर अमिताभ यांचे चांगले मित्र आहेत. त्‍यावेळी इंडस्‍ट्रीतील दिग्‍गज व्‍यक्‍ती लग्‍न सोहळ्‍याला उपस्‍थित होते. रेखाने लग्‍नात एन्‍ट्री घेतली आणि लोक पाहतच राहिले. तिने आपल्‍या केसाच्‍या भांगेत ‘सिंदूर’ लावलं होतं. गळ्‍यात मंगळसूत्र घातलं होतं.

(त्‍यावेळी सगळ्‍यांना वाटलं होतं की, रेखा आणि बिग बींनी गुपचूप लग्‍न केलं आहे.) त्‍यावेळी रेखा थेट अमिताभ यांच्‍याजवळ गेली आणि त्‍यांच्‍याशी बोलू लागली. असंही म्‍हटलं जात होतं की, बोलण्‍याच्‍या नादात अमिताभ जया यांच्‍याकडे लक्ष देत नव्‍हते.

असा झाला ‘सिलसिला’चा शेवट झाला

त्या दोघांमधील वाढती जवळीक पाहून जया बच्चन नेहमी चिंतेत असायच्‍या. एकदा त्‍यांनी अमिताभ यांच्‍याकडे नाराजी व्‍यक्‍त केली. रेखासोबत कुठलाही चित्रपट न करण्‍याबद्‍दल जया यांनी अमिताभना सांगितले होते. नंतर अमिताभ आणि रेखा यांचं भेटणं बंद झालं. त्‍यांनी रेखासोबत चित्रपट केले नाहीत. त्‍यांच्‍यातील नातं हळूहळू संपुष्‍टात आलं. शेवटी त्‍यांचा ‘सिलसिला’ संपला.

दोघांनी अनेक चित्रपट केल्‍यामुळे या दोघांमध्‍ये प्रेमसंबंध आहेत, अशी अफवा त्यावेळी पसरली होती. ती अद्‍यापही कायम आहे!

हेही वाचलं का?

 

Back to top button