Parineeti Raghav: राघव-परिणीती लवकरच लग्नबंधनात? हार्डी संधूने दिल्या शुभेच्छा | पुढारी

Parineeti Raghav: राघव-परिणीती लवकरच लग्नबंधनात? हार्डी संधूने दिल्या शुभेच्छा

पुढारी ऑनलाईन डेस्क : परिणीती चोप्रा सध्या आप खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत डेटिंगवरून चर्चेत आहे. आजकाल दोघेही कधी विमानतळावर तर कधी रेस्टोरेंट बाहेर स्पॉट होतात. (Parineeti Raghav) दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना बॉलिवूड अभिनेता आणि गायक हार्डी संधूने दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. हार्डी संधूने परिणीतीसोबत कोड नेम तिरंगा चित्रपटात काम केलं होतं. अभिनेता हार्डी संधूने परिणीतीला फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. (Parineeti Raghav)

hardy sandhu
hardy sandhu

हार्डी संधूने दिल्या शुभेच्छा

एका मुलाखतीत हार्डीने म्हटलं की, मी खूप खुश आहे की, हे अखेर घडलं. मी त्यांना शुभेच्छा देतो. जेव्हा आम्ही कोड नेम तिरंगाचे शूटिंग करत होतो, तेव्हा आम्ही लग्नविषयी बातचीत करायचो. मी तेव्हाच लग्न करेन, जेव्हा मला वाटेल की, मला योग्य मुलगा मिळाला आहे. फोन करून मी तिच्याशी बोललो आणि शुभेच्छा दिल्या, असे हार्डी म्हणाला.

राघव-परिणीती काही दिवसांपूर्वी एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट झाले होते. त्यानंतर दोघांच्या डेटिंगचे वृत्त समोर आले होते. आता हार्डी संधूचे परिणीतीला शुभेच्छा देणे हा लग्नाचा इशाराच म्हणू शकता.

 

Back to top button