Dhanush : अठरा वर्षांचा संसार मोडल्यावर धनुष पुन्हा चढणार बोहल्यावर | पुढारी

Dhanush : अठरा वर्षांचा संसार मोडल्यावर धनुष पुन्हा चढणार बोहल्यावर

पुढारी ऑनलाईन : दिग्गज अभिनेते रजनीकांत यांचा जावई व दाक्षिणात्य अभिनेता धनुष ( Dhanush ) याच्याबद्दल सध्या जोरात चर्चा आहे. धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांचा घटस्फोट झाला आहे. दोघांनी १८ वर्षे संसार केल्यानंतर गेल्या वर्षी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट झाल्यानंतर धनुष दुसऱ्यांदा विवाह करणार आहे. धनुष नक्की कोणासोबत विवाह बंधनात अडकणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

धनुष मल्याळम अभिनेत्री मीनाबरोबर लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दुसऱ्या लग्नाबद्दल धनुषने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण अभिनेता बलवाने याने धनुषच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. बलवाने याने एका मुलाखतीत सांगितले की, सध्या धनुष लग्राची तयारी करत आहे. सध्या सर्वत्र धनुष आणि मल्याळम अभिनेत्री मीना यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे.

महत्त्वाचे म्हणजे, मीनाचे देखील दुसरे लग्न आहे. शिवाय अभिनेत्रीला एक मुलगीदेखील आहे. मीनासोबत धनुष याचेदेखील दुसरे लग्न होणार आहे. धनुष आणि पहिली पत्नी ऐश्वर्या यांना दोन मुले आहेत. घटस्फोटानंतरदेखील अनेक ठिकाणी धनुष आणि ऐश्वर्या मुलांसाठी एकत्र आले. दोघांच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला.

Back to top button